राजकीय

हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही, संजय राऊत

विधिमंडळाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. हे विधिमंडळ नाही, तर चोरांचे मंडळ आहे असे वादग्रस्त विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर परखड भाषेत टीकास्त्र सोडले आहे. मात्र, भाजपच्या कारवारला आपण भीत नसल्याचे संजय राऊत यांनी सूचित केले आहे. ते म्हणाले, माझ्या विरोधात जर हक्कभंग आणण्यात आला, तर त्यावर चर्चा होईल, मी माझी म्हणणं तिथे मांडेन. मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही. (sanjay-raut-slams-rulling-party)

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर विरोधकांनी सडकून टीका केली. आज पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला होता. यानंतर शिंदे-फडणवीस गटाने आक्रमक भूमिका घेत राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या विधानाबाबत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात आक्रमक प्रतिक्रिया दिली. तसेच विरोधकांच्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली.

विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो
संजय राऊत यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे की, “मी काय म्हणालो होतो, हे आधी समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्या पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही आमदार विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते आता हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

PCMC: काय सांगतोय पुणे निवडणूकीचा एक्झिट पोल; कसब्यात रवींद्र धंगेकर येणार, चिंचवडमध्ये कमळ फुलणार?

तुम्हाला देश सतत पेटता ठेवायचा आहे का? हिंदू संस्कृतीला खुजेपणा आणू नका; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे कान टोचले

राऊतांच्या जिभेला करवंदीचा काटा टोचायला हवा; संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई

टीम लय भारी

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

5 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago