30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराऊतांच्या जिभेला करवंदीचा काटा टोचायला हवा; संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई

राऊतांच्या जिभेला करवंदीचा काटा टोचायला हवा; संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी गटातील आमदारांनाही विरोधकांच्या रणनीतीला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याने विधानसभेत वादळी चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तिखट शब्दांनी बेजार झालेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला आहे. विधिमंडळाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याचे भाजपने म्हंटले आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. हे विधिमंडळ नाही, तर चोरांचे मंडळ आहे असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर परखड भाषेत टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला असून ते वैफल्यग्रस्त झाल्याचे विधान केले आहे. संजय राऊतांकडे काही राहिले नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल, असे भरत गोगावले यांनी म्हंटले आहे. (Action taken against sanjay raut in budget session)

Action taken against sanjay raut in budget session

खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या धोरणांवर मागील काही दिवसांपासून टीकेची झोड उठवली आहे. दररोज नवनवीन आरोपांचे शाब्दिक बाण संजय राऊत भाजपवर सोडत असतात. राऊतांच्या आरोपांनी बेजार झालेल्या सत्ताधाऱ्यांनी अखेर त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करत असल्याचे म्हंटले आहे. संजय राऊत यांनी भाजप किरीट सोमय्यासारख्या २८ चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम राबवत असल्याचा आरोप केला आहे. ‘आयएनएस’ विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणी तपास यंत्रणांची चौकशी सुरु होती. मात्र, सरकार बदलताच या चोरांना ‘क्लिन चीट’ देण्यात आली, अशी टीका राऊत यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर संजय राऊत यांनी यामागे २००० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला देश सतत पेटता ठेवायचा आहे का? हिंदू संस्कृतीला खुजेपणा आणू नका; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे कान टोचले

अखेर विधीमंडळात गाजणार महिला धोरणाचा मुद्दा.!

शिंदे-फडणवीस सरकारने ST कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर; कोर्टाच्या आदेशानुसार पगार वेळेत, मात्र 780 कोटींची PF, ग्रॅच्युईटी थकविल्याचे विधानसभेत केले मान्य!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी