राजकीय

संजय राऊत यांचे धक्कादायक वक्तव्य, आता तुम्हाला आम्ही बरबाद करू

टीम लय भारी

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीनं कारवाई केल्यानंतर हा वाद वाढल्याचं दिसत आहे. राऊत यांनी भाजपवर पत्राच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे.(Sanjay Raut’s shocking statement)

आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते, असं संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.आम्ही खूप दिवस बर्दाश्त केलं आहे आता तुम्हाला आम्ही बरबाद करू, असा निर्वाणीचा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे. एकेकाळचे मित्र असणारे भाजप आणि शिवसेना सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत

‘मुंबईत शिवसेनेचा दरारा’, संजय राऊत यांचा ईडीविरुद्ध घणाघात

‘निवडणूक आयोगाने पंतप्रधान, भाजपा अध्यक्षांनाही स्पष्ट आदेश द्यावे; राऊतांचा निशाणा

Under leadership of Aaditya Thackeray, Shiv Sena will contest Lok Sabha polls across country: Sanjay Raut

शिवसेना हे महाराष्ट्राचे पॉवर केंद्र आहे. त्याच ठिकाणी बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य आणि देशाला दिशा दिली. त्याच शिवसेना भवनात उद्या 4 वाजता पीसी होईल. मी असेलच. पण ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार, असं संजय राऊत म्हणाले.

Pratikesh Patil

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

3 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

3 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

5 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

8 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

8 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

11 hours ago