राजकीय

शरद पवार गटाला धक्का! स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर उर्वरित टप्प्यांसाठी राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात असताना शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का बसलाय. आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी हा फटका बसला आहे. पक्षाचे स्टार प्रचारक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.(Sharad Pawar faction shocked! Case against star campaigner Anil Deshmukh)

अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आहेत. तसेच ते माजी मंत्री देखील आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरु असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहे. अशात त्यांच्यावर आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियमांनुसार, स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून 48 तास आधी जाण्याच्या सुचना असतानाही अनिल देशमुख यांनी शुक्रवारी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली. दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली होती.

बंदी असतांनाही स्टार प्रचारक मतदारसंघात असल्याने आचरसंहितेचं उल्लंघन झाल्याचे म्हणत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, अनिल देशमुख यांच्यावर आदर्श आचारसहितेचे भांदवि 1860 अन्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुख हे महाविकास आघाडीच्या पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. यासह ते वर्ध्याचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा देखील आहे. अमर काळे यांच्या प्रचाराची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी हिंगणघाट येथे जात तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आचारसंहितेच उल्लंघन केल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

टीम लय भारी

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

1 hour ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

2 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

2 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

3 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

3 hours ago