Categories: राजकीय

राष्ट्रवादीने पाडला मराठीचा मुडदा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक  आहेत. साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात त्यांचा वावर आहे. ते चांगले वाचकही आहेत. असे असताना त्यांच्याच पक्षाच्या ‘कंत्राटी मीडिया’ सेलने  मराठीचा पार ‘मुडदा’ पाडला आहे. नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्युप्रकरणी राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काढण्यात आलेल्या या संवेदनशील विषयावरील प्रेस नोटमध्ये ‘शब्द-दारिद्रय’ वाक्यागणिक निदर्शनास येत आहे. या प्रेस नोटमध्ये शीर्षकात शब्दाचे अक्षरशः ‘धिंडवडे’ काढून ते ‘दिंनधोडे’ असे लिहिले आहे. तर ‘प्रसूती’ हा शब्द ‘प्रस्तुती’ असा  लिहिल्याचे ही प्रेसनोट वाचल्यावर जाणत्या वाचकाला लक्षात येते. वास्तविक पाहता एखाद्या पक्षाकडून काढण्यात येणाऱ्या प्रेसनोटमध्ये त्या त्या पक्षाची भूमिका मांडण्यात येते. असे असताना त्यात जर मराठीचा मुडदा पडत असेल तर हे फार लज्जास्पद आहे. शरद पवार हे स्वतः चांगले लिहितात, ते चांगले वाचक आहेत. असे असताना त्यांच्याच पक्षाकडून मराठीची अवहेलना होत आहे,  ही  बाब चाहत्यांना खटकणारी आहे.

2014 पासून देशात इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेब मीडिया पत्रकारितेची  चलती आहे. भाजपने मोदी पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी  या नव्या माध्यमांसह समाज माध्यमांचा बेखुबीने वापर सुरू केला. त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपचा मीडिया सेल अजूनही मजबूत आहे. सलग दोन लोकसभा निवडणुका मोदी यांनी याच नवमाध्यमांच्या जिवावर जिंकल्या. त्यामुळे राज्यातील दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी  यांनी आता या नवमाध्यमांचा वापर करायला सुरुवात केली आहे.

राज्यातील जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले मीडिया सेल तयार केले आहे. नेत्यांची भाषणे, सभा, मुलाखती, प्रेसनोट, समकालीन विषयांवरील राजकीय नेत्यांचे ट्विट हे सगळे काही छापील आणि दृकश्राव्य माध्यमांना पोहचवण्याचे काम हे मीडिया सेल करते. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आता धावपळ करून बातम्या मिळवण्याचे कष्ट काही पडत नाही. शिवाय आयती प्रेसनोट मिळाल्यावर ही मंडळी आपल्या दुसऱ्या कामासाठी मोकळे  होतात.

हे सुद्धा वाचा
हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांचा राजीनामा घेण्याची कॉँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांना विनंती
पीक विमा भरपाई करा नाहीतर… कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिला सूचक इशारा
दीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

२ जुलै रोजी अजित पवार यांनी ८ आमदारासह भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या ९ आमदारांना मंत्री पदेही मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला मीडिया सेल अधिक प्रभावी केला. त्याच्या तुलनेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मीडिया सेलच्या प्रेसनोट व्याकरणाची ‘ऐशीतैशी’ करणाऱ्या असतात.

राज्यात अनेक क्रांतिकारक बदल घडवत मराठी भाषा टिकावी यासाठी शरद पवार कायम आग्रही असतात. असे असताना नवशिकी मंडळी संवेदनशील  मीडिया सेलमध्ये भरती करून राष्ट्रवादी  कॉँग्रेस  हसे करून घेत आहे. राष्ट्रवादीतील जाणत्या मंडळींनी  यात लक्ष घालण्याची गरज काही माध्यमातल्या व्यक्तींनी व्यक्त  केली.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

28 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago