राजकीय

पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू आहेत. सध्या ते महाविकास आघाडीत आहेत, उद्या असतील की नाही माहीत नाही. त्याचप्रमाणे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस बेभवशाचा पक्ष असल्याच चव्हाण यांनी सूचवलं होतं. या विधानसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवार यांनी चव्हाणांना खोचक टोला लगावला. सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपाने घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

सातारा येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात्त पवार बोलत होते. पवार म्हणाले की, ‘पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे, ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहे, ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार’, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य
कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला. पवार यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या नाकारल्या असल्या तरी संशयाचे धुके कायम आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी करत ते आमच्याबरोबर राहतात. मात्र, कर्नाटकात ते काँग्रेसविरुद्ध लढतात. भाजपसोबत त्यांची रोज बोलणी चालली आहेत. कोण नेता येणार, कोण जाणार याच्या सतत बातम्या येत आहेत. त्यांनी काय तो निर्णय एकदा घ्यावा, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच, राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा :

डेडलाईन हुकणार; 75 हजार मेगाभरती आचारसंहितेत अडकणार!

फौजदाराचा हवालदार झालेल्यांनी…; जयंत पाटीलांचे फडणवीसांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

Sharad Pawar, Prithviraj Chauhan, NCP, BJP, Sharad Pawar taunt Prithviraj Chavan, Sharad Pawar on Prithviraj Chauhan, Sharad Pawar on Prithviraj Chauhan who called ncp b bjp team

Team Lay Bhari

Recent Posts

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

20 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

5 hours ago