35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईमुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाडेश्वर यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अचानक जाण्याने शिवसेना ठाकरे गटात शोककळा पसरली आहे. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.

तीन चार दिवसांपूर्वीच विश्वनाथ महाडेश्वर गावावरून परतले होते. सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं दुःखद निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. एक विनम्र आणि अभ्यासू नेत्याच्या अचानक जाण्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

दुपारी 12 नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येतील. अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल, त्यांनंतर दुपारी 4 वा. अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

हे सुद्धा वाचा :

शरद पवार म्हणाले, अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बजूला करण्याची वेळ आली आली आहे

रुपया ‘ग्लोबल’चे मिशन भंगले, मोदींनी देशाची अब्रू घालवली

कळंबोलीत ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची डोक्यात, मानेवर वार करुन हत्या

महाडेश्वरांचा अल्प परिचय
मुंबईतील प्रतिष्ठित रामनारायण रुईया महाविद्यालयातून विश्वनाथ महाडेश्वर यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर वडाळा येथील बीपीसीए महाविद्यालयातून व्यावसायिका पदव्युत्तर पदवी घेतली. सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते. तीन वेळा नगरसेवक झालेले महाडेश्वर 2002 साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडणूक आले. 2003 मध्ये बीएमसीच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर 2007 आणि 2012 साली पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 8 मार्च 2017 रोजी त्यांनी मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला होता. मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत महाडेश्वर मुंबईचे महापौर होते. 2019 मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला.

Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar passed away, Vishwanath Mahadeshwar, Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar passed away due to heart attack

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी