राजकीय

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे दर्शन घेणार, अन् बहुमताला सामोरे जाणार

टीम लय भारी

मुंबई : आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. बाळासाहेबांच्या स्मृतीथळाचे दर्शन घेऊ, शिवाजी महाराज व आनंद दिघेंना वंदन करू, अन् विधानसभेत बहुमताला सामोरे जाऊ, असे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बंडखोर आमदारांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, आमच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. दोन तृतियांश पेक्षा जास्त संख्याबळ आहे. बहुमत व संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे बहुमत चाचणीची आम्हाला चिंता नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. ही शिवसेना हिंदुत्वाला पुढे नेणारी आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम व्हायला हवे. महाराष्ट्रातील जनता सुखी व्हायला हवी. महाराष्ट्राला आम्ही प्रगतीपथावर नेणार आहोत. सदनाच्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.

आमदारांवर कोणताही दबाव नाही

कामाख्या देवीच्या दर्शनाला आलेल्या सगळ्या आमदारांकडे तुम्ही पाहा. सगळेजण कसे मस्त फिरत आहेत. आनंदात आहेत. समाधानी आहेत. कुणाला तरी जबरदस्तीने आणले आहे, असे दिसत आहे का ? असा सवालही शिंदे यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला.

आसामसाठी ५० लाख रुपयांची देणगी

सर्व बंडखोर आमदार आज गुवाहाटीवरून गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली. गुवाहाटीच्या मुक्कामात आम्हाला आसामच्या जनतेकडून आपुलकी मिळाली. म्हणून शिंदे यांनी ५० लाख रूपये दिल्याचे बंडखोरांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले.

हे सुद्धा वाचा :

ईशा अंबानीकडे रिटेल व्यवसायाची सूत्रे

अस्थिर सरकारने काढले 443 जीआर

बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत राहण्याची आसाम सरकारला केली परतफेड

संदिप इनामदार

Recent Posts

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

30 mins ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

2 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

3 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

3 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

4 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

5 hours ago