राजकीय

राणेंवर या नेत्यांचा पलटवार; दौऱ्या दरम्यानच्या कृतीवर सुनावले खडेबोल

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा कोकण आपात्तीग्रस्त भागातील दौरा चांगलाच चर्चेत रंगला. भानसोडून, मुख्यमंत्र्यांना एकेरी शब्दात बोलल्यामुळे शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील या शिवसैनिक नेत्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना चांगलेच बोल सुनावले आहेत (Shiv Sainik leaders retaliate against Rane).

शंभूराजे देसाई यांनी आमच्यातही सडेतोड उत्तर देऊन तोंड बंद करायची ताकत आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यामुळे कोकणावर अशी आपत्ती ओढवली आहे. तेच पांढऱ्या पायाचे आहेत, असा त्यांच्याच शब्दांचा पलटवार त्यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच…

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

पूरग्रस्त चिपळूणचा दौरा करण्यासाठी केंद्रिय मंत्री झाल्यानंतर राणे यानिमित्त प्रथमच राज्यात आले होते. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा देखील चिपळूण भागात दौरा असल्यामुळे बहुतांश अधिकारी हे त्यांच्या सोबत होते. राणे जेव्हा दौरा करण्यास पोहचले तेव्हा तिथे कोणीही वरिष्ठ अधिकारी नसल्याने संताप व्यक्त केला. नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी ‘सीएम बीएम गेला उडत’ अशा एकेरी शब्दात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांला झापले. मुख्यमंत्र्यांनबद्दल असे एकेरी वाक्य ऐकल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या (Hearing such a single sentence about the Chief Minister, there was a strong reaction among the Shiv Sainiks).

“नारायण राणे यांच तोंड बंद करण्याची ताकत प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षाने शांत राहण्याचे आदेश दिल्यामुळे आम्ही गप्प आहोत. पक्षाकडून आदेश आला तर राणे यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि त्यानंतर मंत्री आहोत हे लक्षात ठेवावे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांनबद्दल बोलताना शब्द विचारपूर्वक वापरावेत” असा इशारा देसाई यांनी राणेंना दिला आहे.

नारायण राणे

5 हजारापेक्षा कमी किंमतीत टॉप 10 स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

Union minister Rane upset as officers were not present during his Chiplun visit

पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यावर संकट आले. अश्या नैसर्गीक आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करावे हेच लोकप्रतिनिधींचे पाहिले कर्तव्य आहे. या नैसर्गिक आपत्तीचे राणे राजकारण करत आहेत. नारायण राणे हे केंद्रिय मंत्री झाल्यामुळेच कोकणावर हे संकट आले आहे. तेच पांढऱ्या पायाचे आहेत. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर बोललेल्या शब्दांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवरच पलटवार केला आहे (Minister Gulabrao Patil has retaliated against Rane for his words against the Chief Minister).

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. परंतू, जिल्हाधिकारी कुठे आहेत, तहसीलदार कुठे आहे असे विचारत बसू नये. आम्ही देखील विरोधी पक्षात होतो, आम्ही देखील असे दौरे केलेत, परंतू असे प्रश्न विचारत बसलो नाही. आपण अधिकाऱ्यांना नाही, आपात्तीग्रस्तांना भेटायला आलोय याचे भान प्रत्येकाने ठेवावे, प्रशासनाच्या कामात अडचण येईल असे वागू नये. मुख्यमंत्र्यांना अश्या खालच्या स्वराची भाषा कधी वापरली गेली नव्हती.” राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्याला, सर्वत्र नाराजीच व्यक्त होत आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

2 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

5 hours ago