33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच...

संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच…

टीम लय भारी

नगर:- नगर येथील एका कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे तो आमका असे म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे (Sanjay Raut has attacked Narayan Rane you are known as a Shiv Sainik).

नगरच्या येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केले. संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे तो आमका असे म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटलं जाते. तुम्ही कुठेही जा लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा हल्लाबोल राऊत यांनी राणेंना लगावला (Sanjay Raut made this statement while speaking at an event in the nagar city).

Video : राजकारणातील भीष्माचार्य हरपला

Video : भास्कर जाधव तुझी औकात 2024 ला तुला दाखवून देऊ – निलेश राणे यांची बोचरी टीका

आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असेही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut has attacked Narayan Rane
संजय राऊत आणि नारायण राणे

गुजराती देखील सामना पेपर घेतता

सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटले तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असे सांगितले. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून

Shiv Sena to go solo in UP: Sanjay Raut

मुख्यमंत्री वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दिल्लीच्या‌ तक्तावरही भगवा फडकवू

दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. मी पुन्हा येईल मी पुन्हा पुन्हा येईल, जोपर्यंत शिवसेनेचा ‌झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईल, असा फडणवीसांना टोला लगावतानाच दिल्लीच्या‌ तक्तावरही भगवा फडकवू. हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तिच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असे संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut criticized Fadnavis without naming him).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी