राजकीय

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही कोर्टाने शोधलेली पळवाट !

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही कोर्टाने शोधलेली पळवाट आहे, अशी श्रीरंजन आवटे यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिंदे सेनेचे बेकायदेशीर सरकार यांना तूर्तास  जीवदान देणारा निर्णय दिल्यानंतर सोशल मीडियावर क्रिया-प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. आवटे यांची “जस्टीस इज डिलेड अँड डेड !” ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

श्रीरंजन आवटे यांच्या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे, की उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणे ही चूक आहे. ती कोर्टाने शोधलेली पळवाट आहे. ही पोस्ट अशी – 

तार्किक भाग आहे :

  1. जर राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे चूक होते, तर त्या अवैध बहुमत चाचणीला उद्धव सामोरे गेले नाहीत, ही चूक कशी?
  2. शिंदे फडणवीस यांनी घेतलेली बहुमत चाचणी अवैध होती, असे आता सर्वोच्च न्यायालयाला वाटत आहे; पण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानेच बहुमत चाचणी घ्या, असे सांगितले, त्याचं काय? नेमकं योग्य काय ?
  3. जर शिंदेंनी नेमलेला व्हीप चुकीचा आहे, तर सरकार अवैध आहे, असे सर्वोच्च न्यायालय का म्हणत नाही?

असे अनेक अंतर्विरोध या निकालात आहेत.

न्यायव्यवस्थेवर विश्वास उरणार नाही, अशी अवस्था आजच्या निकालामुळे तयार झाली आहे, हे निश्चित !

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनेक ज्योक्स, मीम्सही व्हायरल होत आहेत. ते असे  – 

लग्न लावण्याचा निर्णय योग्य नव्हता
▪️पुजारी अयोग्य होता
▪️मंत्र चुकीचे होते
▪️फेरे मारले ते योग्य होते
▪️लग्न तूर्त कायम
▪️नवरा नवरी एकमेकांना अनुरूप आहेत का याचा निर्णय पुजारी घेईल
वरील परिस्थितीचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संबंध नाही. असल्यास योगायोग समजावा.


मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर .
एकमेकांची पसंती बेकायदेशीर .
साखरपुडा बेकायदेशीर .
लग्न बेकायदेशीर .
पण झालेले बाळ मात्र कायदेशीर…

इमारत पूर्णतः बेकायदा आहे,
मालक बेकायदा आहे,
आर्किटेक्ट बेकायदा,
बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय…
पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील!
– सर्वोच्च निवाडा


चोरांनी चोरी केली हे बेकायदेशीर कृत्य
– सर्वोच्च न्यायालय
.
चोरांना ज्यांने पाठबळ दिले ते पाठबळ बेकायदेशीर
– सर्वोच्च न्यायालय
.
चोरी केलीच तर मग चोरीचा माल चोरांनाच दिला हे मात्र कायदेशीर आहे..
– सर्वोच्च न्यायालय
.
न्यायपालिका जनतेचा विश्वास गमावत चालली एवढे मात्र सत्य आहे.

हे सुद्धा वाचा : 

गोगावलेंचे प्रतोदपद बेकायदा ठरवल्याने ठाकरेंच्या आमदारांना बळ

सत्तासंघर्षात तूर्तास शिंदे सेनेला जीवदान; ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार वाचलं!

कर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस; कॉंग्रेसचे पारडे जड

कोर्टाचा निकाल:
शिंदे यांनी ठाकरेंना नोबॉल टाकला.
फडणवीसांनी अंपायरकडे खोटी अपील केली.
अंपायर कोशारी यांनी चुकीचा निर्णय देत आऊट दिले.
आणि अशाप्रकारे नोबॉलवर ठाकरेंची विकेट घेतली.
पण थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत ठाकरे मैदान सोडून मातोश्रींकडे जाऊन बसले.
“त्यामुळे आता त्यांना परत बॅटिंगला बोलवता येणार नाही.
ते मैदानावरच असते, तर त्यांना परत बॅटिंग करायला लावली असती.
आता उरलेली मॅच कंटिन्यू करा.”, असं थर्ड अंपायर म्हणतोय.


द्यूत खेळले- चूक
फासे गंडलेले- चूक
डावावर सर्वस्व लावलं- चूक
द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला-चूक
भीष्मपितामहांना सर्व काही चुकले हे मान्य आहे.
पण राज्य दुर्योधनालाच.
वनवास पांडवांनाच.
मी काही करू शकत नाही म्हणत भीष्म न्यायालयातून बाहेर पडले.
महाभारताचे पुजारी!

Supreme Court Decision, Shivsena Battle, Uddhav Thakre Eknath Shinde, Maharashtra Supreme Court Memes Jokes

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

7 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

8 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

8 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

8 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

9 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

12 hours ago