30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओकर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस; कॉंग्रेसचे पारडे जड

कर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस; कॉंग्रेसचे पारडे जड

कर्नाटकमध्ये पाच वर्षे भाजपचे सरकार होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात काँग्रेसने भाजपला आव्हान उभे केले. या निवडणुकीत मोदींनी प्रचारसभा घेऊन देखील त्यांचा करिश्मा तेथे दिसून आला नसल्याचे चित्र प्रचारसभांमध्ये दिसून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीही फिक्याच झाल्या.

कर्नाटकात मोदींच्या तोंडाला फेस आला असून कॉंग्रेसचे पारडे जड दिसत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक 2023साठी आज, बुधवारी, 10 मे रोजी मतदान पार पडत आहे. कर्नाटकमध्ये पाच वर्षे भाजपचे सरकार होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात काँग्रेसने भाजपला आव्हान उभे केले. या निवडणुकीत मोदींनी प्रचारसभा घेऊन देखील त्यांचा करिश्मा तेथे दिसून आला नसल्याचे चित्र प्रचारसभांमध्ये दिसून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीही फिक्याच झाल्या.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान पार पडले आहे. 13 मे रोजी, शनिवारी निकाल येतील. अवघ्या देशाचे लक्ष या निकालांकडे लागून आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पडले. काही ठिकाणी गैरप्रकार, बोगस मतदानाच्या तक्रारी आहेत.

 

‘भारत जोडो यात्रा’मधून प्रेरणा घेतलेला ‘एद्देळू कर्नाटक’ हा पक्ष यावेळी रिंगणात होता. याचा अर्थ ‘जागा हो कर्नाटका’. कर्नाटक राज्यातील जागृत नागरिक, विविध जनचळवळी यांच्या पुढाकाराने हा मंच स्थापला गेला आहे. डावे गट, कामगार आणि स्त्री संघटना, धार्मिक व अल्पसंख्य विभाग यांनी स्वयंभू उत्स्फूर्तरीत्या एकत्र येऊन हा मंच स्थापन केला. यात अनेक पत्रकार, पुरोगामी लेखक, चित्रपटसृष्टीतील मंडळी, कलाकार आहेत. अर्थात हा काही काँग्रेसचा पाठीराखा पक्ष नाही. या पक्षाच्या कामगिरीकडेही लक्ष राहील.

हे सुद्धा वाचा :

माझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

हनुमान जन्मस्थळ कर्नाटकात; योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यानंतर जन्मस्थळाचा वाद पुन्हा उफाळणार ?

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

Karnataka Assembly Election Analysis, Modi Karishma Failed, Exit Poll 2023, Karnataka Election, Karnataka Exit Poll

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी