राजकीय

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसमध्ये फूट, स्टार प्रचारक भाजपात

टीम लय भारी

लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. राहुल गांधी यांच्या युवा ब्रीगेडचा भाग राहिलेले आरपीएन सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे(Uttar Pradesh, split in Congress, star campaigner in BJP).

यूपीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्री राहिलेल्या आरपीएन सिंह यांना काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले होते. मात्र त्यांनी अचानक राजीनामा देऊन कॉंग्रेसला धक्का दिला आहे. राजीनाम्याची घोषणा करत त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, ‘मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व स्वीकारत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र निर्माणाच्या कार्यात योगदान देणार आहे.'(RPN Singh leaves the Congress party)

आरपीएन यांनी आज आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे सुपुर्त करुन ट्वीटरवरील आपलं प्रोफाइलही बदललं आहे. तसेच काँग्रेसशी संबंधित पदांबाबतचा उल्लेख तिथून हटवून एक ट्विट केले आहे. ‘संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच मी माझ्या राजकीय वाटचालीचा नवा अध्याय सुरू करत आहे. जय हिंद’ असे ते ट्विट मध्ये म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मैदानात

मुलायम सिंह यादव यांची सूनबाई अपर्णा यादवांचा भाजपमध्ये प्रवेश

‘A new beginning for me’: RPN Singh switches to BJP ahead of UP polls

आरपीएन यांना कुशीनगरमधील पडरौना मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा भाजपाचा निर्धार आहे. तत्पुर्वी भाजपाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात गेलेले स्वामी प्रसाद मौर्य याच जागेवरुन मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध आरपीएन यांना मैदानात उतरवून कॉंग्रेसला टक्कर द्याययची भाजपाची खेळी आहे.

पडरौना हा मतदारसंघ उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेवर आहे. येथील राजघराण्याचा वारसा आरपीएन यांचा असून या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर १९९६, २००२ आणि २००७ असा तीन वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. मौर्य यांचाच त्यांनी पराभव केला होता. मौर्य हे बसपाकडून लढले होते. कुशीनगरमधील विजयानंतर आरपीएन यांना मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.

Team Lay Bhari

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

11 mins ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

49 mins ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 hour ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago