राजकीय

इंडियाच्या बैठकीत वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची मेजवानी

मोदी विरोधात देशभरातील विरोध ‘इंडिया’ या बॅनरखाली एकवटले आहेत. आज आणि उद्या इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. देशातील 28 पक्ष सदस्य 63 या बैठकीला उपस्थित राहत आहेत. आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होईल. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. 28 पक्षांचे नेते येणार आहेत. विविध राज्यातील हे नेते आहेत. मात्र, असं असलं तरी या नेत्यांना खास मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद चाखायला मिळणार आहे.सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेले वांगी असे मराठमोळे खाद्यपदार्थच ठेवण्यात आले आहेत. वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळीपर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांवर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे.

आज संध्याकाळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. देशभरातील महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे. या नेत्यांसाठी नाश्त्याला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे. तसेच सोबत चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणी तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांसाठी स्वीट डिशमध्ये नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पाहुण्यांना गरमागरम पुरणपोळीचा अस्वादही चाखता येणार आहेत. या पाहुण्यांसाठी झुणका भाकरही ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही यावेळी असणार आहे.

ग्रँड हयात हॉटेलमध्ये 100 हून अधिक रुम बुक करण्यात आले आहेत. हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमधील रुमही बुक करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व करत आहेत. तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. आज संध्याकाळी सर्व नेत्यांची औपचारिक बैठक होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने ही बैठक व्यवस्थित पार पडावी म्हणून 18 लोकांची एक टीम तयार केली आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांच्या 6-6 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उद्या (1 सप्टेंबर रोजी) सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर लंचनंतर दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
हे सुद्धा वाचा
आशिया कप २०२३: दुबळ्या नेपाळला बाबर आझमने झोडले !
इंडियाच्या संयोजकपदी शरद पवार यांचे नाव चर्चेत
बच्चू कडू को घुस्सा क्यु आया!; ऑनलाईन गेमिंगची जाहीरात सचिन तेंडुलकरला भारी पडणार!


दरम्यान, इंडिया आघाडीच्या मेजवानीवर मनसेने टीका केली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. राज्यात 3 आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. तर भाजपा आमदार आशीष शेलार यांनीही इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

4 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

5 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago