‘पैगंबर बिल’ या सारखे भविष्यात येणारे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील : प्रकाश आंबेडकर

टीम लय भारी

मुंबई : पैगंबर बिल संसदेत(Paigambar Bill) सादर झाले असून ती आता हाऊसची प्रॉपर्टी झाली आहे. तसेच संसदेने अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. अशी हि प्रॉपर्टी कायद्याच्या स्वरूपात नक्की भविष्यातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अस्तित्वात येईल आणि अशा प्रकारचे कायदे धार्मिक राजकारण आणि जातीय Vanchit BAhujan Aghadi तेढ निर्माण करून केल्या जाणाऱ्या राजकारणाला आळा घालेल.(Paigambar Bill)

मुस्लिम समाजाने सक्रिय राजकारणात येऊन स्वतःचा आवाज भारतीय राजकारणात बुलंद (Paigambar Bill) केला पाहिजे. निव्वळ पाठिंबा देणारा मतदाता न होता भविष्यातील पिढीसाठी सक्षम उमेदवार देखील निर्माण केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन(Vanchit BAhujan Aghadi) आघाडीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर(Prakash Yashwant Ambedkar )यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी संचालित https://paigambarmohammadbill.org/ या वेबसाईट चे उदघाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.

पैगंबर बिल(Paigambar Bill) मधील मसुदा आणि तरतुदी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत. हा सोहळा साकीनाका येथील दारुल उलूम अली हसन अहले सुन्नत शाळेच्या सभागृहात झाला. तसेच वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सहारा हॉटेल (कुर्ला) ते अनिस कंपाउंड साकीनाका पर्यंत भव्य रॅली आयोजित केली होती.

या रॅलीत जवळपास दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, आपण फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे आणि भारतीय संविधानाचे पाईक आहोत. हा कायदा जातीय तंटे किंवा सामाजिक अराजकता माजविणाऱ्या समाज कंटकांची किंवा त्या प्रकारच्या मानसिकतेची पायमल्ली करणारा आहे.(Vanchit BAhujan Aghadi)

या बिल(Paigambar Bill) मध्ये तशा प्रकारचे कठोर प्रविधान करून ठेवले आहे. कर्नाटकात चाललेले हिजाब प्रकरण असो किंवा दलित मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समाजातील कमकुवत घटकांना यामुळे बळकटी येईल. या प्रसंगी मुस्लिम संघटनांचे मान्यवर मौलाना मोहम्मद अशरफ साहब, मौ. सय्यद मो. राशीद अशरफ साहब, मौ. मो. हाशिम अशरफी साहब, मौ. मो. कमर रजा अशरफी साहब, मौ. मो. सय्यद मंजूर अशरफी साहब, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिस्त पालन समिती आणि राज्य प्रशिक्षण समिती सदस्य महेंद्र रोकडे   , मुंबई प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अबुल हसन खान, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

‘पैगंबर बिल’ सारखे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील;प्रकाश आंबेडकर यांचे मत;’वंचित’कडून 

Jyoti Khot

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

8 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

9 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

9 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

9 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

9 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

13 hours ago