राजकीय

…तर मी भाजपच्या चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्यामुळं बारामतीच्या राजकारणाला नवं वळण

बारामती लोकसभेची (Baramati Loksabha election 2024) लढत यंदा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. राज्याचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा  मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार (Pawar vs Pawar) अशी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडं विजय शिवतारे (vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरोधात भूमिका ठोकली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अशातच आता शिवतारे यांनी, वेळ पडली तर मी भाजपच्या चिन्हावर लढणार असं वक्तव्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (vijay Shivtare big statement I will fight on BJPs lotus symbol from baramati lok sabha seat)

शिवतारेंच्या वक्तव्यामुळं बारामतीच्या राजकारणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे.

त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे यांनी ठामपणे सांगितलं आहे. तसेच, भाजपच्या चिन्हावरही लढायला मी तयार असल्याचे शिवतारे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिवतारे?

अजित पवार यांच्या पत्नीला उमदेवारी देण्याच्या चर्चेमुळे महायुतीची एक जागा धोक्यात आली आहे. कारण अजित पवार यांची पत्नी कोणत्याही परिस्थिती निवडून येऊ शकत नाही. मतदारसंघात पवारांविषयी प्रचंड रोष आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पवारविरोधी मतदाराला मतदानाची संधी देण्यासाठी मी ही निवडून लढवत आहे.

कुटुंबातील लढाईवर शरद पवारांच्या बहिणीचं मोठं वक्तव्य; कोणाची घेतली बाजू?

मी आता माघार घेणार नाही. मला काही काळ पक्षापासून दूर व्हावं लागलं तरी चालेल, मी अपक्ष म्हणून निवडून लढायला तयार आहे. मात्र महायुतीत वेगळं वातावरण तयार होईल. त्यापेक्षा ही जागा शिवसेनेकडे घ्यावी आणि मला तिकीट द्यावं, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

अजित पवार – शरद पवार गटात बिनसले, बारामतीत वादंग

कारण जागा निवडून यावी, यासाठी महायुतीत अनेक मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे. काही शिवसेनेच्या जागा भाजपने घेतल्या आहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत, तर मग हा मतदारसंघ शिवसेनेकडे का घेऊ नये? माझी तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढायला हरकत नाही. असं विधान शिवतारे यांनी यावेळी केलं.

धनश्री ओतारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago