33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयअजित पवार - शरद पवार गटात बिनसले, बारामतीत वादंग

अजित पवार – शरद पवार गटात बिनसले, बारामतीत वादंग

आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha election 2024) राज्याचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा(Baramati Loksabha election 2024) मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. लढतीत दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तर शरद पवार आणि अजित पवार यांचे कार्यककर्ते आमनेसामने येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. काल म्हणजेच बुधवारी सोनेश्वर परिसरात सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी बारामतीत गेलेल्या युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालत जाब विचारला. त्यानंतर शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युगेंद्र पवार हे बारामती मधील सोमेश्वर परिसरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अचानक घेराव घातला.

निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटलांचे मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसापासून युगेंद्र पवार तसेच श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी केलेल्या टीकेचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांनी नालायक माणूस म्हणतांना दिसते. यावर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना जाब विचारला.

आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाच्या आईला पाठवले नोटीस, IVFच्या मदतीने दिला बाळाला जन्म

यानंतर शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. यावेळी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्त्यांनी घेराव घालण्यात आलेल्या बातमीला बगल दिली. घेराव वगैरे काही नाही, युगेंद्र दादांना घेराव घालणार अजून जन्माला यायचा आहे. घेराव हा ५० १०० दीडशे लोकांचा असतो. इथ केवळ तीन लोक होते आणि या तिघांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातल्याची बातमी पसरवली. पण तसं काही झालेलं नाही. तिघं भेटलं बोलले आणि निघून गेले.

तर दुसऱ्या एका कार्यकर्त्याने या घटनेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली असं वक्तव्य केलं आहे. बारामती संघात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु आहे. ते अजित पवार यांच्या गटाला पाहवत नाही. त्यामुळे कुठे तर गालबोट लावण्याचा प्रकार अजित पवार गटाकडून सुरु आहे. असा आरोप शरदचंद्र पवार गटाने केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी