राजकीय

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj) मोठे टेन्शन आहे. शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतांनाच दुसरीकडे शांतिगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj) शहरभर लागलेले भलेमोठे होर्डींग्स सध्या चर्चेचा विषय ठरतायत.’जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’ (When the monarchy forgets its duty, the theocracy has to come forward ) असा मजकूर या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे.(‘When the monarchy forgets its duty, dharmasatta has to come forward’: Shantigiri Maharaj)

महायुतीकडून नाशिकसाठी तिकीट मिळावे अशी महाराजांची ईच्छा होती, उमेदवारी अर्ज भरतांना देखील त्यांनी एबी फॉर्म मिळाला नसतांना देखील शिवसेनेच्या नावाने तो भरल्याने महाराजच युतीचे उमेदवार असणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

शांतीगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यास ठाम
नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाल्याने बाबाजी भक्त परिवार नाराज आहे. शांतीगिरी महाराजांचा माघार घेण्यास नकार असून ते अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याची माहिती बाबाजी भक्त परिवाराने दिली असून महाराजांमुळे हेमंत गोडसेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

शांतीगिरी महाराज माघार घेतील – हेमंत गोडसे
दरम्यान, शांतीगिरी महाराजांबाबत हेमंत गोडसेंनी सूचक वक्तव्य केले आहे. हेमंत गोडसे म्हणाले की, शांतीगिरी महाराजांचे म्हणणं ऐकून घेतले जाईल आणि ते माघार घेतील असा आम्हाला विश्वास आहे. शांतीगिरी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. धार्मिक स्थळं असतील किंवा इतर त्यांच्या मागण्या आम्ही मार्गी लावू, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

विजय करंजकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर लोकसभा लढवत आहेत. तर शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना दिलासा मिळाला आहे. नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

12 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago