राजकीय

बिहार निवडणुकीमुळे महाराष्ट्राची बदनामी का?, सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :- अभिनेता सुशांतसिंह (Sushant Singh) राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही सुशांतच्या मुत्यूचे गूढ उलगडले नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक (Bihar elections) लढावयची होती (BJP wanted to contest Bihar elections in the name of Sushant Singh Rajput suicide). यावरून राष्ट्रवादीने भाजपवर बोचरी टीका केली. त्यामुळे सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

सुशांतसिंहच्या (Sushant Singh) आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुशांतसिंहच्या (Sushant Singh) आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला. त्यानंतर ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झाले?, असा सवालही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंहच्या (Sushant Singh) आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंना युवा पदाधिकाऱ्यांचे बर्थ डे गिफ्ट, वाचा सगळ्यात मोठी मोहीम

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर केली टीका

Sushant Singh Rajput death case current status: What is the CBI, NCB, ED update?

विविध कार्यक्रमांचे आयोजन

आज सुशांतच्या (Sushant) मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ सांताक्रुझच्या वाकोला येथील नजमा हेपतुल्ला हॉलमध्ये गरजूंना ट्राय सायकल, विकलांगांना आवश्यक साहित्य, शिलाई मशीन्स आणि रेशन सामानांचे वाटप केले जात आहे. देभरात सुशांतच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुशांतला न्याय देण्याची मागणीही सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.

वर्षभरापूर्वी आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh) राजपूत याने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती. परंतु, सुशांत (Sushant) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या (Sushant) चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत (Sushant)  आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. परंतु सुशांतने (Sushant) आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले होते.

सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट?

अभिनेता सुशांतसिंह (Sushant Singh) राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड-अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये ८ जून २०२० ला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील ८  हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने केलेल्या सिद्धार्थ पिठाणीच्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago