31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयआरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर केली टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर केली टीका

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाज आणि संभाजी राजे (Sambhaji Raje) आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे (Sambhaji Raje has criticized Chandrakant Patil on the issue of Maratha reservation). मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) सुनावले.

खासदार संभाजी छत्रपती आज कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना १६ जूनच्या मोर्चाविषयी विचारण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेवरही विचारण्यात आले. त्यावर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. २००७  पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असे सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असे संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्यांची वारीत पुनरावृत्ती होऊ नये; अजित पवार

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटी संदर्भात नवाब मलिकांनी केला खुलासा

GST rates slashed on Covid-19 essentials, no tax on ‘black fungus’ medicine

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार

आम्ही संभाजीराजेंना (Sambhaji Raje) भाजपचे मानतो, ते स्वत:ला भाजपचे मानतात की नाही माहीत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना संभाजीराजेच (Sambhaji Raje) दिसत आहेत. आपण रोज सकाळी उठल्यावर देवाचा मंत्र म्हणतो. ते संभाजीराजेंचा मंत्र म्हणत आहेत. आमच्यात का दुरावा आहे हे त्यांनाच विचारा. मी काही ज्योतिषी नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी ज्योतिषाला कधीही मानले नाही, असे सांगतनाच मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्या मार्गाने जायचे? सरकारनेच ठरवावे

मराठा आरक्षणावर मी सर्व काही बोललो आहे. समाजाने ५८  मोर्चातून आपल्या भावनाही मांडल्या आहेत. आता काही बोलण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे समाजाला रस्त्यावर आणावे या मताचा मी नाही. समाज बोललाय, मी ही बोललोय. आता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. राज्याची जबाबदारी काय आणि केंद्राची जबाबदारी काय हे लोकप्रतिनिधींनी सांगायला हवे, असे सांगतानाच आरक्षणावर दोन तीन मार्ग मी सांगितले आहेत. कोणत्या मार्गाने जायचे हे सरकारनेच ठरवायचे आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी अजून दीड वर्ष जाईल. तोपर्यंत मराठा समाजाच्या विकासासाठी पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी