राजकीय

देवेंद्र फडणवीसांना पराभवानंतर सुचले शहाणपण

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघही गमवावे लागले आहेत. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शहाणपण सुचले असून त्यांनी स्ट्रॅटेजीत चूक झाल्याचेही मान्य केले आहे.

विधान परिषद निवडणूक निकालानंतर फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचे विश्लेषण करायचे झाले तर तीन पक्षांची ‘पॉवर’ जोखण्यात आम्ही कमी पडलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कबुली दिली आहे. तसेच भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र, आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. एकट्या भाजप विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे.

आमचा एकतरी आला; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही. त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago