31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांना पराभवानंतर सुचले शहाणपण

देवेंद्र फडणवीसांना पराभवानंतर सुचले शहाणपण

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघही गमवावे लागले आहेत. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शहाणपण सुचले असून त्यांनी स्ट्रॅटेजीत चूक झाल्याचेही मान्य केले आहे.

विधान परिषद निवडणूक निकालानंतर फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचे विश्लेषण करायचे झाले तर तीन पक्षांची ‘पॉवर’ जोखण्यात आम्ही कमी पडलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कबुली दिली आहे. तसेच भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र, आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. एकट्या भाजप विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजप 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे.

आमचा एकतरी आला; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसे आम्ही आत्मचिंतन केले पाहिजे, तसे ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही. त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी