राजकीय

मंत्री यशोमती ठाकूर यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणा-या युवकाला ठोकल्या बेड्या

टीम लय भारी

अमरावती : अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ‘बघून घेण्याची’ धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले(Yashomati Thakur: The one who threatened her was handcuffed)

आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, अशी तक्रार काँग्रेसच्या दिग्गज नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी पोलिसांना फोनवरुन दिली होती.

पवारसाब और दादाने जिल्हा बँकमें राजे लोगों को एकही मारा लेकिन सॉलिड मारा

“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा

काय आहे प्रकरण?

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना काही अभ्यागत त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. ज्यामध्ये ओबीसी महासभेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाढवे हा युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होता.

नेमकं काय घडलं?

मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करत आहेत. आपण सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी प्रवीण गाढवे यांनी आपल्या निवेदनातून केली. मात्र अचानक कुणालाही काही कळण्याच्या आतच प्रवीण आणि पालकमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला.

“आय. सी. सी. चे कोड्यातील प्रशासन“ : अभय गोवेकर (पुर्वार्ध)

Amravati riots: Maharashtra minister Yashomati Thakur and LoP Devendra Fadnavis engage in war of words

यशोमती ठाकूर यांचा आरोप काय?

संबंधित तरुणाने आपल्याला ‘बघून घेण्याची’ धमकी दिली, अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरुन दिली. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.

आरोपीचं म्हणणं काय?

पोलिसांनी तातडीने धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रवीण गाढवे याला ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित तरुण हा ओबीसी महासभेचा राज्य अध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे. तर याबाबत प्रवीण गाढवे यांची प्रतिक्रिया घेतली असता, तुम्ही राजकारण करत आहात. मलाच पालकमंत्री ठाकूर यांनी धमकी दिला, असा आरोप प्रवीण गाढवे यांनी केला.

तर याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाही, अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

2 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

18 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

20 hours ago