टॉप न्यूज

आधार कार्डमुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा

टीम लय भारी

नवी दिल्ली: भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने आधार कार्डधारकांना त्यांचा मोबाईल क्रमांक नेहमी आधारमध्ये अपडेट ठेवण्यास सांगितले आहे. यूआयडीएआयने स्वतःला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा सल्ला दिला आहे. जर मोबाईल नंबर अपडेट केला नाही, तर आधारमधून होणाऱ्या फसवणुकीची माहिती उपलब्ध होणार नाही आणि त्याची तक्रार पुढे नोंदवता येणार नाही (Aadhaar card fraud update this number early to avoid fraud).

यूआयडीएआयने लोकांना सावध केले आहे की आधार ऑनलाइन सेवेसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक असल्याने, आधारमध्ये जो काही क्रमांक आहे तो अपडेट केला पाहिजे. जर मोबाईल हरवल्यावर नंबर बदलला तर तो तात्काळ आधारमध्ये अपडेट करावा. जर आधारमध्ये कोणताही फोन नंबर दिला नाही, तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन त्वरित नोंदणी करावी.

शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

थरार : औरंगाबादेत राहत्या घरात प्राध्यापकाची गळा चिरून निर्घुण हत्या!

आधार बनवताना आम्हाला ईमेल, पत्ता आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. नंतर काही बदल झाला तर तो अपडेट करावा लागेल. आधारमध्ये माहिती अपडेट केली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही आधारच्या वेबसाइटवर त्याची पडताळणी करू शकता. मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाई करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा.

मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाई कसा कराल?

* UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला uidai.gov.in वर भेट द्या किंवा https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile वर क्लिक करा.
* UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर ‘माझे आधार’ पर्यायावर क्लिक करा
* आता आधार सेवा टॅबवर जा आणि ईमेल/मोबाईल नंबर सत्यापित करा निवडा
* तुमचा 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक इथे टाका. संपर्क तपशीलात, मोबाईल नंबर आणि ईमेल इत्यादी तपशील द्या.
* आता कॅप्चा पडताळणी पूर्ण करा
* आता ओटीपी पाठवा वर क्लिक करा

केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा महाराष्ट्र बंदला विरोध – राष्ट्रवादी काँग्रेस

How To Download Or Get Aadhaar Card Without Registered Mobile Number?

यानंतर तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी येईल. हे दर्शवेल की तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आधारमध्ये नोंदणीकृत आहे. जर मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट केला नसेल तर तुम्ही करू शकता. आधारमध्ये मोबाईल क्रमांक नोंदणी किंवा अपडेट करण्यासाठी अर्जदाराला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. नंबर अपडेट होण्यासाठी 90 दिवस लागतात. आपला मोबाईल नंबर आधारमध्ये नोंदणी करण्यासाठी, खालील सूचनांचे पालन करा.

मोबाईल क्रमांकाची आधारमध्ये नोंदणी कशी कराल?

* तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या आणि आधार कार्ड करेक्शन फॉर्म भरा.
* आधारमध्ये अपडेट होण्यासाठी मोबाईल नंबर टाका.
* करेक्शन फॉर्म सबमिट करा आणि प्रमाणीकरणासाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा द्या.
* आधार केंद्राचा कर्मचारी तुम्हाला एक पावती देईल.
* पावतीवर अपडेट रिक्वेस्ट नंबर (यूआरएन) नमूद केला आहे.
* यूआरएनचा वापर करून आधार अपडेट स्थिती तपासली जाऊ शकते.
* आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर (आधार सोबत मोबाईल नंबर अपडेट करा), तुम्हाला दुसरे आधार कार्ड घेण्याची गरज नाही.
* तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत होताच तुमच्या नंबरवर आधार ओटीपी येणे सुरू होईल.
* तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही UADAI च्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करून आधारची अद्ययावत स्थिती देखील तपासू शकता

कीर्ती घाग

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago