टॉप न्यूज

मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या उमेदवार !

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आणखी एक उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक साठी काँग्रेसने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. काँग्रेसने आता या जागेवर वर्षा गायकवाड यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

काँग्रेसकडून वर्षा गायकडवाड यांना उमेदवारी
मुंबईतील दोन जागावरील उमेदवार अद्यापही महाविकास आघाडीने जाहीर केलेले नव्हते, या दोन्ही जागा काँग्रेसकडे आहेत. यातील एका जागेवर काँग्रेसने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकडवाड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.(Varsha Gaikwad from Mumbai North Central, who is the Mahayuti candidate?)

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील मविआचा उमेदवार ठरला
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, अखेर वर्षा गायकवाड यांच्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र, त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.

उत्तर मुंबई मतदारसंघातून मविआचा उमेदवार कधी ठरणार?
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता उमेदवारी झाल्याने वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीकडून उत्तर मुंबई मतदारसंघाच्या आणखी एका जागेवर उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. आता मुंबई उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार की, ठाकरे गटाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे.

वर्षा गायकवाड यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण?
दरम्यान, असं असताना आता वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. महायुतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात महायुती आता कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे आता लक्ष लागलं आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

2 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

2 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

2 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

2 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

3 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

6 hours ago