टॉप न्यूज

अफगाणिस्तानात बिकट स्थिती, संकटग्रस्त तरूणीने पत्रातून मांडली करूण कहाणी !

टीम लय भारी

मुंबई : अफगाणिस्तान मधील सध्याची परिस्थिती तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. तालिबान्यांनी कब्जा करून अफगाणिस्तानवर हुकूमशाही गाजवायला सुरुवात केली आहे. पण ह्यातच तिथल्या मुलींना आता स्वतःच्या देशात सुखरूप वाटत नाहीये. अफगाणिस्तानच्या एका मुलीने ह्यावर तिच्या मनातले दुःख आणि भीती व्यक्त करत एक पत्र लिहलेले आहे (Afghanistan girl has written a letter expressing her grief and fear).

त्या पत्राचे मराठीतील भाषांतर पुढील प्रमाणे

‘माझे नाव जाहिदा, मी फरीया प्रांताच्या एका शहरात राहते. मी 19 वर्षांची आहे. 2 वर्षांपूर्वीच मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि काबुल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आहे. परंतु मला वाटत नाही की मी यापुढे कधी तिथे शिकण्यासाठी जाऊ शकेल असेच मुळीच वाटत नाहीये. कारण आता माझे संपूर्ण शहर तालिबान्यांच्या हातात आहे (Afghanistan in the hands of the Taliban).

अफगाणिस्तानचे दोन्ही खेळाडू खेळणार आयपीएल

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

माझी एक समवयस्क मैत्रीण आहे. तिला तालिबानी लोकांनी उचलून नेले आणि एका तालिबानी नेत्याच्या मुलाशी लग्न करून दिले. कोणास ठाऊक आता ती कशी आहे कोणत्या अवस्थेत आहे. तिची देखील माझ्या सारखीच खूप शिकून देशासाठी काही तरी करायचे असे स्वप्न होते.

जागोजागी तालिबानी लोकांनी इथे स्वतःचे वर्चस्व निर्माण करून आमच्या देशावर कब्जा केला आहे. जरी त्या तालिबानी लोकांचे लग्न झाले असले तरी ते सुंदर दिसणाऱ्या मुलींशी जबरदस्ती लग्न करतात. मला देखील भीती वाटते की माझ्यासोबत देखील असे नाही ना होणार? माझ्या मैत्रीणी प्रमाणेच माझे हाल नाही ना होणार? हा विचार जरी मनात आला तरी खूप भीती वाटते.

काही तालिबान्यांची आमच्या परिसरात घरे आहेत. काही लोक सरकारी इमारताती राहतात. ते प्रत्येक घरातून खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पैसे मागतात. काही दिवसांपूर्वी ते आमच्या घरी देखील आले होते. त्यांनी आमच्याकडून 30-40 जणांसाठी काबुली पुलाव मागितला होता. आम्हाला तो जबरदस्तीने त्यांच्या भीतीने त्यांना द्यावा लागला. कारण त्यांना कोणी देखील नाही बोलू शकतच नाही. प्रत्येक घरातून ते लोक अश्याच प्रकारे जबरदस्ती मागण्या करतात.

त्यांनी काही शिक्षकांकडून देखील पैसे मागितले होते. माझी आई शिक्षिका आहे. तिच्याकडून त्यांनी एक हजार अफगाणी घेतले होते. मी ज्या ठिकाणी रहाते ते ठिकाण फार सुंदर आहे. परंतु, तिथे स्त्रियांसाठी सुरक्षितताच नाहीये. तिथे फक्त तालिबान्यांनी त्यांची दहशत माजवून ठेवली आहे. मला तर खिडकीच्या बाहेर डोकावून पाहायला देखील भीती वाटते. त्या लोकांची नजर जर माझ्यावर पडली तर माझे काय होईल ह्या विचाराने.

नाक कापणे, गोळ्या झाडणे, दगडाने ठेचणे… वाचा तालिबान्यांची क्रूर कहाणी

MLC Nomination Talks Likely In Uddhav Thackeray-Governor Meet: Sources

तालिबानी ह्यावेळेस आम्ही बदलू असे बोलत आहेत, परंतु ते काही खरे होईल असे वाटत नाही. मी जेव्हा डोळे बंद करते तेव्हा मला अंधार दिसतो, परंतु मी जेव्हा डोळे उघडते तेव्हा देखील मला आजूबाजूला फक्त आणि फक्त अंधारच दिसतोय. तालिबान्यांबद्दलची भिती मनात ठाण मांडून बसली आहे.

माझी बहिण भारतात शिकत आहे. तिला शिक्षण पूर्ण करून परत आपल्या देशात यायचे आहे. परंतु तालिबान्यांच्या भीतीने ती आता नाही येत आहे. माझे माझ्या देशावर अफगाणिस्तानवर खूप प्रेम आहे. मी माझ्या देशाची सेवा करण्याची माझी खूप इच्छा आहे. तालिबान्यांच्या हुकूमशाहीने आमच्या देशाला पूर्णपणे उध्वस्त करून टाकले आहे.

अफगाणिस्तानच्या एका मुलीने ह्यावर तिच्या मनातले दुःख आणि भीती व्यक्त करत एक पत्र लिहलेले आहे

मी माझ्या जेवढ्यापण मैत्रिणींशी बोलते, तेव्हा त्या देखील तालिबान्यांना घाबरून गेल्या आहेत असे सांगतात. दारावर जरी कोण आले तरी, तालिबानी आले की काय? अशी भीती वाटते.

ही संपूर्ण गोष्ट खरी आहे. शिवाय माझे नाव आणि माझे ठिकाण हे सोडून, माझी ओळख मला लपवावी लागली आहे. ह्याचे कारण देखील मनातील तालिबान्यांची भीती आहे.

या अफगाणी मुलीचे हे शब्द खरे आहेत. जाहिदा ने तिचे हे पत्र दैनिक भास्करच्या पत्रकार पूनम कौशल यांच्या सोबत शेअर केले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago