33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजतालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

टीम लय भारी

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबान राज्यस्थापनेच्या दृष्टीने पावले टाकत आहे. निव्वळ अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवून फायद्याचे नाही हे तालिबानला कळून चुकले आहे. इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध तयार करण्याच्या दृष्टीने तालिबान पाहत आहे(Taliban is looking to build friendly relations with other nations).

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्वच देशातील नागरिकांना मायदेशी परतण्याची चिंता होती. मात्र त्यावेळी भारताने आपले आंतरराष्ट्रीय वजन वापरून भारतीयांना लीलया मायदेशी तालिबान्यांच्या तावडीतून सोडवून आणले. यानंतर तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह याने भारताला महत्वाचा देश असे संबोधले आहे.

अनिल परब यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी – आशिष शेलार

शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण

Taliban
भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी : तालिबान

भारत हा आशिया खंडातील एक महत्वाचा देश आहे आणि त्याचबरोबर भारतासोबत भारतासोबत राजनैतिक संबंध जोडणेदेखील आमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. अशा आशयाचे मत तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह याने मानले.

भारत पाकिस्तान संबंधाबाबत बोलताना जबीउल्लाह असेही म्हणाला की भारताने पाकिस्तानसोबत असलेल्या व्यवहाराचा विचार करायला हवा. तसेच भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. त्याचबरोबर भारताने  अफगाणिस्तानच्या इच्छेनुसार आपले धोरण आखावे असाही सल्ला तालिबान नेता मुजाहिद याने भारताला दिला आहे. भारताला अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याच देशाविरोधात करू दिला जाणार नाही असेही मुजाहीदने यावेळी स्पष्ट केले.

राज्यकर्ते घडविणारी प्रदर्शनी

Afghanistan crisis: ‘We are more scared of Pakistanis among the Taliban’

सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. भारताला आशिया खंडात महत्वाचे स्थान असल्यामुळे भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करणे तालिबानच्या फायद्याचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी