टॉप न्यूज

Tokyo Paralympics : अवनी लेखराने भारतात इतिहास रचला, नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले

टीम लय भारी

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या खात्यातील हे पहिले सुवर्णपदक आहे. अवनी लेखराने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे (Avni Lakhera won the gold medal in shooting).

याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.

टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार

मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, मोनिका बत्रा यांची टोकियो ऑलंपिक मधे आगकुच

अवनी लेखराने फायनलमध्ये २४९.६ पॉईंट्स मिळवले. अवनीच्या या कामगिरीने पॅरालिम्पिक्समधील नवा रेकॉर्ड बनला आहे. अवनीला फायनलमध्ये चीनच्या नेमबाजाने जोरदार फाईट दिली. मात्र गोल्डन ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या अवनीने सुवर्ण पदक मिळवूनच मैदान सोडले. चीनच्या झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवत, रौप्य पदक पटकावले.

महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णवेध घेतला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

Shooter Avani Lekhara Becomes First Indian Woman to Win Gold at Paralympics

अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाला होता. जयपूर, राजस्थानची येथे राहणारी, अवनीची महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच १ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले (But in the end, she decided to pursue a career in shooting).

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago