33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजटोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी...

टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार

टीम लय भारी

मुंबई:- जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ओलिम्पिक 2020मध्ये भारताने दोन पदक जिंकले आहेत. भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपानची यामागूची अकानेचा शुक्रवार (ता.30) पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र आज शनिवार (ता.31) पी. व्ही सिंधूला टोक्यो ओलिम्पिकमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. सिंधूला महिला एकेरी वर्गात दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी चीनी ताइपेच्या ताई त्जू यिंग हिने मात दिली. मात्र, सेमीफायनलपर्यंत पोहोचल्याने सिंधूला कांस्य पदक मिळण्याची शक्यता असून तिचा कांस्यपदकासाठीचा सामना रविवारी (1 ऑगस्ट) रोजी असेल. (P. V. Sindhu has lost in badminton at the Tokyo Olympics).

पी. व्ही. सिंधूने सामन्यात सुरुवातीपासून कडवी झुंज दिली पहिल्या सेटमध्ये पुढे असणारी सिंधून हळूहळू मागे पडली आणि नंतर ताईने तिला परत पुढे येऊच न दिल्याने सिंधू पराभूत झाली. दोघांमधील सामना अत्यंत रोमहर्षक झाला. पण ताई हिने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत सिंधूला कोर्टवर थकवून एक वेगळी रणनीतीने सामना जिंकला. आजच्या सामन्यात 21-18 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला (P. V. Sindhu put up a bitter fight from the start of the match)

बॉक्सर लव्हलिनाचा उपांत्य फेरीत प्रवेश, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित

तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

P. V Sindhu has lost in badminton at the Tokyo Olympics
पी. व्ही. सिंधू

सामन्यात ताई त्जू हिने वर्चस्व ठेवले होते. मात्र पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधू 5-2 च्या फरकाने ताईवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ताईने आक्रमक खेळ करत काही गुण मिळवले. सिंधूकडूनही काही चूका झाल्याने ताईला आणखी गुण मिळाले. पण सिंधूने जबरदस्त झुंज देत पहिल्या ब्रेकपर्यंत 11-8 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर ताई हिने 11-11 ची बरोबरी साधली. नंतर संपूर्ण सेट संपेपर्यंत दोघीही पुढे मागे अशाच स्कोरवर होत्या मात्र अखेर ताईने आघाडी घेत सेट 21-18 ने जिंकला (P. V. Sindhu took an early 5-2 lead over Tai in the first set).

P. V Sindhu has lost in badminton at the Tokyo Olympics
पी. व्ही. सिंधू

कियारा आडवाणी झाली 29 वर्षाची; जाणून घ्या तिच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

He Bingjiao: All you need to know about PV Sindhu’s opponent in the bronze medal match

दुसऱ्या सेटमध्ये ताई त्जूने पहिला गुण मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये ताईने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड जमवून ठेवली होती. सिंधूनेही अटीतटीचा खेळ दाखवला पण काही चूकांमुळे सतत ताई हिलाच गुण मिळत होते. ज्यामुळे सुरुवा तीपासूनच ती सामन्यात आघाडीवर होती. त्यानंतर मात्र ताइ त्जूने सिंधूसा सामन्यात पुनरागमन करु दिलं नाही आणि अखेर सामना सिंधूच्या हातातून 12-21 च्या फरकाने निसटला (P. V.  Sindhu also showed great play but due to some mistakes, Tai was constantly getting points).

कांस्य पदक मिळण्याची शक्यता

पी. व्ही. सिंधूला तिसऱ्या स्थानासाठी अर्थात कांस्य पदकासाठीचा सामना चीनच्या ही हिच्यासोबत असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 5 वाजता असेल. सुवर्णपदक आणि रौप्यपदक जिंकण्याच्या सिंधूच्या आशा मावळल्या असल्यातरी किमान कांस्य जिंकून भारताला यंदाच्या ऑलिम्पकमधील तिसरे पदक मिळवून देण्याचा सिंधूचा प्रयत्न असेल (P. V. Sindhu will face China for third place, a bronze medal).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी