टॉप न्यूज

भाजप प्रवक्त्याने मोदी सरकारवर डागली तोफ

टीम लय भारी

नवी दिल्ली : देशभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. ‘कोरोना’च्या या गंभीर परिस्थितीत मोदी सरकारचे अपयश व निष्काळजीपणा सपशेल उघड्यावर पडला आहे. अशातच आता भाजपच्या प्रवक्त्या रितू रावत यांनी आपल्याच सरकारवर टीकेची झोड उठविली आहे ( BJP Spokesperson Ritu Rawat slams to Modi government ).

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. ‘कोरोना’मुळे लोकं मरत आहेत. सर्व जमीन स्मशानभूमी बनली आहे. लोक जिवंत राहणार नसतील तर निवडणुका घेऊन उपयोग तरी काय ? अशा त्या म्हणाल्या ( BJP Spokeperson Ritu Rawat asked the question to Modi Government ).

सरकारने निवडणुका घ्यायला नको होत्या. गंगास्नान कशाला घडवून आणले. माझे जवळचे नातलग मी मरताना पाहत आहे. मी स्पष्ट बोलली म्हणून मला प्रवक्ते पदावरून काढले तरी चालेल असा इशाराही रितू रावत यांनी पक्षश्रेष्ठींना दिला ( BJP Spokeperson Ritu Rawat challaged to BJP leaders).

हे सुद्धा वाचा

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपने घ्यावी ; सचिन सावंत

सध्या देशाला नव्या संसद भवनाची नाही, उपाय योजनांची गरज, अमोल कोल्हे बरसले

Congress accuses Modi govt of colossal mismanagement of COVID-19 crisis

देशातील बहुतांश राज्यात ‘कोरोना’ने ( Corona pandemic ) आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. रूग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नाहीत. रेमडेसिवीरचे इंजेक्शनची उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे रूग्णांचे प्राण जात आहेत.

लोकांना प्राण वाचविणे मुश्कील झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये गुंतले आहेत ( Narendra Modi busy in Election ). महाराष्ट्र, दिल्ली अशा बिगरभाजप राज्यांना दुजाभाव देवून त्यांना ‘कोरोना’ लस, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा अत्यल्प पुरवठा करण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत आहे.

मोदी सरकारच्या नस्त्या उठाठेवीमुळे लोकांमध्ये दिवसेंदिवस संताप वाढत चालला आहे. अशात आता खुद्द भाजपच्या प्रवक्त्यांनीच स्व:पक्षावर दुगाण्या झाडल्यामुळे मोदी सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

विश्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेलला सबस्क्राईब करा

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago