टॉप न्यूज

विनाकपड्यांवरच महिलेची चौकशी, आता भरावी लागणार २२ कोटींची नुकसानभरपाई!

टीम लय भारी

शिकागो (अमेरिका) : एका कृष्णवर्णीय महिलेशी गैरवर्तन पोलिसांना महागात पडलंय. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांविरुद्ध न्यायालयात फिर्याद दिली. आता या प्रकरणात न्यायालया(Court)नं महिलेला 2.9 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 22 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिलाय. पाहुया, नेमकं काय प्रकरण आहे ते(Black women: Police fined for misconduct)

महिला एक सामाजिक कार्यकर्ती

अमेरिकेतल्या शिकागो (US, Chicago) इथलं हे प्रकरणआहे. याठिकाणी 2019मध्ये एका गुन्हेगाराच्या शोधात काही पोलीस अधिकारी कृष्णवर्णीय अँजेनेट यंग (Anjanette Young) यांच्या घरात जबरदस्तीनं घुसले.

नासाच्या अंतराळयानाने पहिल्यांदाच सूर्याला स्पर्श केला

Bank strike: आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

अँजेनेट या सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) आहेत. त्यावेळी त्या कपडे बदलत होत्या. मात्र पोलिसांनी कशाचाही विचार न करता त्यांना त्याच अवस्थेत उभं केलं. बेड्या ठोकून सुमारे अर्धा तास चौकशी केली. विशेष म्हणजे पोलीस शोधत असलेला गुन्हेगार अँजेनेट यांच्या घरात नसून शेजारच्या घरात राहत असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे अंजनेट यंग यांना अत्यंत अपमानित वाटलं.

12 पोलिसांना केलं प्रतिवादी

अँजेनेट यंग यांनी फेब्रुवारी 2021मध्ये यासंबंधी खटला दाखल केला, पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या खटल्यात त्यांनी 12 पोलिसांना प्रतिवादी केलं.

नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

Global Covid caseload tops 272 million 

आता या प्रकरणाची सुनावणी झालीय. न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय, की माहिती देणाऱ्याच्या माहितीची पडताळणी करण्यात पोलिसांना अपयश आलं. यामुळे महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांच्या गैरवर्तनासाठी महिलेला 2.9 दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय.

टीम लय भारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

47 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

1 hour ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

4 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

4 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

4 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago