टॉप न्यूज

Coronavirus : बॉक्सरचा कोरोनामुळे मृत्यू

टीम लय भारी

नवी दिल्ली : संपूर्ण जग गेले दोन वर्ष कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा ठप्प करण्यात आल्या होत्या. या रोगाची तीव्रताच इतकी गंभीर होती की जगभर दोन वर्षे कडक लॉकडाऊन लावण्यात आले. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. मात्र असे असले तरी अनेकांना या कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत होते. अनेकजण मला काही होणारच नाही या अविर्भावात कोरोनाकडे दुर्लक्ष केले(Boxing world champion dies of corona).

परंतु या कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच अति आत्मविश्वास एका बॉक्सरला नडला आहे. तीन वेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला फ्रेडरिक सिनिस्ट्रा याला कोरोनामुळे जीव गमावावा लागला आहे. या बॉक्सर फ्रेडरिक सिनिस्ट्राला ‘अंडरटेकर’ म्हणूनही ओळखले जाते.त्याला कोरोनाची लागण झाली होती.मात्र त्याने कोरोनाच्या नियमांचे पालन न करत कोरोनावर मात करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

धक्कादायक: भरल्या ताटावरच पोलीस उपनिरीक्षकाची प्राणज्योत मालवली

या बॉक्सरला लसीकरणावर जराही विश्वास नव्हता.त्यामुळे फ्रेडरिक सिनिस्ट्रा याने लस घेतली नव्हती. ‘कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे.या लसीकरणामुळे कोरोना बरा होतो ही अफवा आहे’,अशी त्याची समज होती.याशिवाय तो कोरोनाशी आपण स्वबळावर मात करु आणि मी वैयक्तिक ताकदीने कोरोनाचा पराभव करेन,असे तो सर्वांना सांगायचा.मात्र या त्याच्या जीवाला घातक ठरणाऱ्या अति आत्मविश्वासाला अखेर फुलस्टॉप लागला.

पूर्वोत्तर राज्यांमधून AFSPA रद्द करण्यासाठी मागणी

Europe witness highest COVID-19 case and death rates across the world

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या विळख्यात हा बॉक्सर अडकला. कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने फ्रेडरिक सिनिस्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला थेट आयसीयूमध्येच दाखल करण्यात आले.मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता आणि उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.यादरम्यान त्याने आपल्या चाहत्यांना ‘मी लवकरच बरा होउन परत येईन’ असे आश्वासन दिले होते.

Team Lay Bhari

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

10 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

11 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

12 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

14 hours ago