टॉप न्यूज

महाराष्ट्रातील बौध्द लेणी संरक्षण व संवर्धन झालेच पाहीजे ,राजाराम खरात

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्र मध्ये अगणित ठिकाणी बौद्ध लेणी असल्याचं आढळून येतं. बौध्द लेणी ही महाराष्ट्राचाच नाहीतर भारत आणि जगाचा अपूर्व  असा ठेवा आहे. या  आपल्या भारतीयांच्या वैभव शाली परंपरेच्या खुणा आहेत आणि ही वैभवशाली परंपरा टिकून ठेवण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करायला हवेत.( Buddhist caves in Maharashtra should be protected and nurtured, Rajaram Kharat)

 एकूणच विविध लेण्यांवर  होणारे अतिक्रमण आणि लेण्यांच्या कडे होणारे सरकारचे दुर्लक्ष हे सारे पाहता असा प्रश्न पडतो  की बौद्ध धम्मा प्रती असलेला नैराश्याचा दृष्टीकोण ठेवून  केंद्रातलं सरकार या सगळ्या घटना कडे  जाणून बुजून दुर्लक्ष तर करीत नाही ना? यासाठी याव विषयावर गहन विचार करून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारला काही मागण्या प्रदान करत आहोत.

त्यातील पहिली मागणी सर्व लेण्यांचा संरक्षण व संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र पातळीवरती एक शासकीय समिती स्थापन करायला करावी अशी आमची मागणी आहे. या समितीमध्ये फक्त बौद्ध धम्माचे अभ्यासक  यांना स्थान देण्यात यावे. दुसरी मागणी अशी आहे की  लेण्यांवर होणारे अतिक्रमण त्वरीत थांबले पाहिजे किंवा जे  जिथे कुठे अतिक्रमण झाले असेल ते अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाई करायला हवी.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!

आदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

राजगड ‘रोप वे’ : सुविधा की विद्रुपीकरण

Despite its significance to Jains and Hindus, continuing archaeological discoveries have revealed the sheer extent of the spread of Buddhism in Gujarat

त्याच बरोबर तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे संपूर्ण लेण्यांचा नकाशा तयार करून एक सर्किट तयार करावे जेणेकरून लेणी अभ्यासक तसेच देशी-विदेशी पर्यटकांना सर्व लेण्या फिरण्याचे नियोजन आयोजन सहजतेने करता येईल. बौध्द पर्यटन हा स्वतंत्र विभाग राज्य शासनाने निर्माण करून त्या माध्यमातून लेणी सरक्षण व संवर्धन करता येईल. उपरोक्त मागण्या पुर्ण झाल्यास  देशी विदेशी पर्यटकांना सर्व लेण्या पाहण्यास सुविधा प्राप्त होईल व त्यांना लेण्यांमध्ये असलेली शांततेची व पावित्र्याची अनुभूती घेता येईल.संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक एक समिती या संरक्षणासाठी लेणी संवर्धन आणि संरक्षणासाठी तयार करायचा आमचा मानस आहे तरी या कार्यास सहकार्य करावे अशी ईच्छा आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago