राजकीय

राज्याबाहेर काही घडलं की या बाप लेकीची जोडी आवाज उठवते; भाजप नेत्याचा पवार कुटुंबीयांवर निशाणा

टीम लय भारी

मुंबई: रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. तिथे काही भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना वाचवण्यासाठी विविध पातळीवर मदत पुरवली जात आहे. सध्या केंद्र सरकारतर्फे मिशन गंगा राबवण्यास सुरुवात झालीय. काही विद्यार्थ्यांना माघार आणण्यात यश आलंय. बरेच भारतीय विद्यार्थी या युद्धातून सुटून बाहेर आले आहे. मात्र अद्याप काहीजण अडकले आहेत. शरद पवार यांनीही मोदी सरकारला विनंती केली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील ट्वीट करत केंद्र सरकारवर खोचक टीका केली.( BJP leader targets Pawar family)

टिका करत त्या म्हणाल्या,  प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, असं ट्वीट त्यांनी केलं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्या दोघांना चिमटा काढत रिट्विट केले आहे.

अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले, “राज्याबाहेर काही घडले की या बापलेकीना कंठ फुटतो एरव्ही राज्यात सुमारे १०० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, राज्यात लूट सुरू आहे, महिला अत्याचार होतायत तेव्हा दोघे बहुधा एफएम वर गाणी ऐकत बसलेले असतात.”

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या अटकेला मुस्लिम जातीचा उल्लेख देण्याचा प्रयत्न, दरेकरांचा गंभीर आरोप

राज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठका लवकरच, ज्योतीरादित्य शिंदेचे आश्वासन

शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता

Maharashtra: Income Tax dept searches premises of Shiv Sena Corporator Yashwant Jadhav, BJP exposes links of money laundering and corruption

युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावले टाकले पाहिजे”, असं शरद पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या – शरद पवारराष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आवाहन केलं आहे. त्यावर शरद पवार यांना ट्वीट करत म्हटलंय की, “मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं. तसंच विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय यांची दुर्दशा आणि हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या.” असं अवाहन त्यांनी ट्वीट केलं आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

3 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

5 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

7 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago