टॉप न्यूज

मंत्रीमंडळाची बैठक रायगडावर घ्यावी : छत्रपती संभाजीराजे

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी चालत जाऊन शिवनेरी किल्ला सर केल्याबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ( Chhatrapati Sambhajiraje applauded to Governor Bhagat Singh Koshyari ).

प्रत्येक मंत्र्यांनी एक किल्ला दत्तक घ्यावा या राज्यपालांच्या आवाहनाचेही संभाजीराजेंनी समर्थन केले आहे. पण मंत्रीमंडळाची दरवर्षी एक तरी बैठक रायगडावर घेण्यात यावी अशी मी मागणी करत आलो आहे. त्या अनुषंगाने राज्यपालांनी सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे ( Chhatrapati Sambhajiraje said, government should organize a cabinet meeting at Raigad )

हे सुद्धा वाचा

अजित पवारांना राज्यपालांनी मारली कोपरखळी

अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

राज्यपालांनी इटूकल्या पिटूकल्या बिबट्यांच्या पिलांची घेतली भेट

Sharad Pawar : शरद पवारांच्या राज्यपाल भेटीमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत चर्चा

शिवाजी महाराजांनी ज्या ध्येयवादाने राज्यभिषेक केला होता, तो हेतू राज्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या ध्यानी येण्यासाठी रायगडावर मंत्रीमंडळाची एक बैठक व्हायला हवी. स्वराज्याचे सुराज्यात कसे रूपांतर करावे याची प्रेरणा राज्यकर्त्यांना मिळेल, असेही संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

राज्यपालांचा शिवसेनेला टोला

शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून अनेकजण मिरवतात. परंतु त्यांचे कार्य आत्मसात करीत नाहीत, अशा शब्दांत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे ( Governor Bhagat singh Koshyari slams to Shivsena ).

शिवनेरी किल्ला सर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांना शिवनेरी किल्ल्यावर नेता यावे म्हणून प्रशासनाने खास पालखीचे आयोजन केले होते ( Governor Bhagat Singh Koshyari vistis Shivneri ). परंतु त्यांनी पालखीची मदत घेतली नाही. तब्बल ५० मिनिटे पायी चालून त्यांनी शिवनेरी किल्ला सर केला. प्रत्येक मंत्र्यांनी एक किल्ला दत्तक घ्यायला हवा, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago