अभिनेत्री दीपाली सय्यद निवडणुकीच्या रिंगणात, जितेंद्र आव्हाडांविरोधात लढणार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद हिने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ती आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरूवारी दिपालीने रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे व अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. मुंब्रा – कळवा मतदारसंघात मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. ही बाब ध्यानी घेऊन दीपाली सय्यद हिला तेथून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे या मतदारसंघात फार मोठे काम आहे. अगदी घराघरात त्यांना ओळखले जाते. आव्हाड यांनाही आपला मतदारसंघ खडानखडा माहित आहे.

दिपाली सय्यद या कुर्ल्यातील आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव सोफिया जहांगीर सय्यद असे बदलण्यात आले होते. सन 2014 मध्ये त्यांनी आप पक्षाकडून अहमदनगर येथे निवडणूक लढविली होती. सन 1990 च्या सुमारास बंदिनी आणि समांतर या दोन्ही टिव्ही मालिकांमधून त्यांची अभिनयाला सुरूवात झाली. जत्रा, ढोलकीच्या तालावर, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवऱ्याची बायको, मला एक चानस हवा, उचला रे उचला, लाडी गोडी, मास्तर एके मास्तर, होऊन जाऊ दे, मुंबईचा डबेवाला, सासू नंबरी जावई दस नंबरी, करायला गेलो एक अशा काही चित्रपटांमध्ये दिपाली यांनी अभिनय केला आहे.

मुंब्रा मतदारसंघात त्या नवख्या आहेत. त्यामुळे त्यांना मतदार कितपत पसंती देतील याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

दिपाली सय्यद यांचे मुस्लिम नाव, चित्रपटातील ग्लॅमर व मराठी लोकांमधील शिवसेनेचे नेटवर्क या तिन्ही बाबी लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

1 hour ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

2 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

3 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

5 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

6 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

7 hours ago