कोकण भाजपमय करणार : नीतेश राणे यांची प्रतिक्रिया

लय भारी न्यूज नेटवर्क

कणकवली : कोणताही जाहीर प्रवेशाचा सोहळा आयोजित न करता नीतेश राणे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. शुक्रवारी ते आपला उमेदवार अर्ज भरणार आहेत. ‘संपूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याची’ प्रतिक्रिया त्यांनी सदस्यत्व स्विकारल्यानंतर व्यक्त केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नीतेश राणे यांना भाजपचे सदस्यत्व दिले. विशेष म्हणजे, सन 2014 च्या निवडणुकीमध्ये जठार हे नीतेश राणे यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी जठार भाजपचे उमेदवार होते, तर नीतेश राणे काँग्रेसकडून निवडून आले होते.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारी नीतेश राणे यांना एबी फॉर्म देणार आहेत. त्यानंतर जाहिररित्या अर्ज भरण्यात येईल. यावेळी खासदार नारायण राणे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे नीतेश यांनी सांगितले.

शिवसेनेचा विरोध असल्यामुळे राणे कुटुंबियांचा भाजप प्रवेश रखडला होता. अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असताना नीतेश राणे यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले आहे. राणे कुटुंबियांना अखेर भाजपमध्ये स्थान दिल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजप – शिवसेना युती असली तरी राणे यांचे काम करणार नसल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. काही मतदारसंघात तर भाजप व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

42 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago