टॉप न्यूज

धक्कादायक : ७२ तासांत २७३ पोलीस करोना पॉझिटिव्ह!

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाचा हाहाकार राज्यात जोराने सुरु आहे. रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहणारे पोलीस कर्मचारी बळी पडत आहे. गेल्या ७२ तासांत २७३ पोलीसांचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून एकच खळबळ उडाली आहे. राज्यात सद्यस्थितीस एकूण १ हजार ४० पोलिसांवार करोनाचा उपचार सुरू असून, आतापर्यंत करोनामुळे ६४ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवेतील कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना लढाईत अक्षरश: आपले प्राण पणाला लावले आहेत. केवळ डॉक्टर, परिचारिका किंवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीच नव्हे तर पोलीस, रेल्वे, बेस्ट, पोस्ट, एसटी, बँक या क्षेत्रांतील २०० पेक्षा अधिक कोरोनायोद्धय़ांनी आतापर्यंत प्राण गमावले आहेत. करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

राजीक खान

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

1 hour ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

5 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

5 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

7 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

8 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

8 hours ago