टॉप न्यूज

खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं ; पण यश साजरा करण्यासाठी कोणीही भारतीय उपस्थित नव्हते

धनश्री धुरी : टीम लय भारी

मुंबई : खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पहिलं ऑलिम्पिक पदक होते. खाशाबा यांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले होते. परंतु ज्या वेळी खाशाबा जाधव यांना पदक मिळाले होते त्या वेळी त्यांच्या यशात सामील व्हायला  त्यांच्याबरोबर कोणीही भारतीय व्यक्ती नव्हती ( Khashaba Jadhav was India’s first individual medalist in the Olympics).

सन 1952 मध्ये फिनलँडच्या हेलसिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला जागतिक स्तरावर आपली नवी ओळख बनवण्याची ही सुवर्ण संधी होती. खाशाबा यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे भारताला कुस्तीमध्ये पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळाले होते.

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

गोपीचंद पडळकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्याही विरोधात दंड थोपटले

खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले

ऑलिम्पिक स्पर्धा संपायला 2 ते 3 दिवसच बाकी होते. खाशाबा यांच्या सोबत आलेल्या भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा झाल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांना हेलसिंकी शहर पाहण्याची घाई झाली होती. इतरांचीही शहर फिरण्याची तीव्र इच्छा होती.

फिरण्याच्या नादात प्रताप चंद खाशाबा यांच्या सामन्याचा दिवसही विसरून गेले होते. त्यांनी स्वतःच खाशाबा यांना आपल्या सोबत फिरायला येण्यासाठी सांगितले. परंतु , खाशाबा यांनी फिरायला येण्यासाठी नकार दिला. ते इतरांचे कुस्तीचे सामने बघण्यासाठी मैदानाकडे गेले.

इतर दोन पैलवानांचा सामना सुरू होता. त्यावेळी खाशाबा यांना ध्वनीक्षेपक यंत्रातून एक आवाज आला. खाशाबा यांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु जाधव हे आडनाव त्यांना कळले. त्यांनी पुढे जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की पुढचा सामना हा त्यांचाच आहे.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात… भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष

Why There Is No Khel Ratna Award In The Name Of Khashaba Jadhav? Shiv Sena Criticizes Modi Government

खाशाबा यांच्याबरोबर त्यावेळी भारतीय संघातील कोणीही नव्हते. त्यांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या खेळाडूंवर मात केली , आणि भारताला पदक मिळवून दिले. ( Khashaba won the Bronze medal for India)

ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी खाशाबा यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले होते

जेव्हा हेलसिंकी येथे ऑलिम्पिक खेळण्यासाठी जायचे होते तेव्हा खाशाबा यांच्याकडे पैसे नव्हते. तिथे जाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावातून उधार घेतले होते. तसेच स्वतःचे घरही गहाण ठेवले होते.

कीर्ती घाग

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago