32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईबाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे राजकारणा सोबतच एक व्यंगचित्रकारसुद्धा होते. बाळासाहेबांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात परप्रांतीयांचे वर्चस्व वाढू लागले.  मराठी समाजाला त्याच्याच राज्यात परप्रातीयांकडून घाटी, रामागडी, पाणग्या अशी विशेषणे मिळत होती .बाळासाहेबांनी 13 ऑगस्ट 1960 रोजी ‘मार्मिक’ साप्ताहिक सुरू केले. मार्मिकमधून त्यांनी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायावर व्यंगचित्रातून भाष्य केले.( Balasaheb Thackrey started commenting on social issues through cartoons)

सन 1964 साली मराठी समाजातील काही व्यक्तींनी केंद्रीय आस्थापनात, खासगी उद्योगात, कारखान्यातील नोकरीत मराठी तरुणांना डावलले जातेय अशी तक्रार घेऊन बाळासाहेबांकडे आले होते. बाळासाहेबांनी याची दखल घेत मार्मिक मधून भाष्य करायला सुरुवात केली. त्यांनी टेलिफोन डिरेक्टरी मधून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे काढत, त्यावर  काहीही न बोलता छापायला सुरुवात केली. त्यांनी ‘वाचा आणि थंड बसा ‘ हे सदर चालवत मराठी तरुणांच्या व्यथांना वाचा फोडली. नंतर त्याचे रूपांतर त्यांनी ‘वाचा आणि उठा’ असे केले होते.

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणाऱ्या संपादकांचे निधन

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली
‘मार्मिक’ मधील परप्रांतीयांवर रेखाटलेले व्यंगचित्र

‘ मार्मिक ‘ मधून बाळासाहेबांनी  मुंबईतील मराठी समाजाला 80 टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आणि मराठ्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता. (Balasaheb Thackrey demanded in ‘Marmik’, that the Marathi community in Mumbai should get 80 per cent jobs). सन 1961 च्या जनगणनेमध्ये मुंबईची लोकसंख्या 41 लाख 52 हजार 56 एवढी होती. त्यात मराठी भाषिक 17 लाख 43 हजार 864 एवढे तर दक्षिण भारतीयांची संख्या 3 लाख 40 हजार 164 होती. मुंबईत मराठी भाषिक वर्ग बहुसंख्येने असला तरी रोजगाराच्या बाबतीत तो अल्पसंख्यांक होता. दक्षिण भारतीय समाज त्या काळात मुंबईतील बहुसंख्य नोकऱ्या बळकावून बसला होता.

बाळासाहेबांनी ‘ मार्मिक ‘ साप्ताहिकातून यावर भाष्य करत ‘उपऱ्या परप्रांतीयांची हकालपट्टी करा ‘ असा धडाका लावला होता.  मार्मिकच्या पाचव्या वर्धापनदिनी संपादकीय लेखात बाळासाहेब लिहितात, ‘ सारे भारतीय हे आमचे देशबांधव आहेत, पण आमचे बांधव जर आमच्यावर कुरघोडी करून मराठी माणसांच्या तोंडचे हक्काचे अन्न तुडवत असतील , तर त्यांना तेवढ्यापुरता अवश्य प्रतिसाद केला पाहिजे.अन्य राज्यातील देशबांधवांवर आम्ही महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने टीका करीत असलो तरी आमच्या मनात त्यांच्याबद्दल आकस नाही. त्यांनी जर काही चांगले केले, तर त्याचा गौरवही आम्ही केलेला आहे. मार्मिक ची भूमिका स्वच्छपणे महाराष्ट्रप्रेमी आणि भारतनिष्ठेशी आहे. तसेच ती शुद्ध राष्ट्रीयत्वाचीही आहे. सामान्यांचा कैवार घेऊन आम्ही सतत लढणार आहोत. ‘ कोणी वंदा, कोणी निंदा, महाराष्ट्र हिताचा आमुचा धंदा ‘.

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली
‘मार्मिक’ साप्ताहिकातील व्यंगचित्र

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 युवक सन्मानित

Maharashtra: Ruling Shiv Sena’s Funding Declines By Over 15 Percent

मार्मिकच्या 5 जून, 1966 च्या अंकात एक चौकट प्रसिद्ध करण्यात आली होती ती अशी, ‘ यंडूगुंडूचे मराठी माणसांच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार विशेष माहितीसाठी.’अशा प्रकारे परप्रांतियांना संकेत देत 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. (Shiv Sena was formed on 19 June 1966.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी