टॉप न्यूज

Boris Johnson : गेल्या वर्षी ट्रम्पच्या लवाजम्याने कोरोना पसरवला, आता जॉन्सन यांच्याबाबतीत नेमकं काय ? सरकारच्या निणर्याकडे लागले लक्ष

टिम लय भारी

ब्रिटन : ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे जग भयभीत झाले आहे. असे असतानाच यंदा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येत आहेत. आता त्यांच्याबाबतीत काय करायचं? असा प्रश्न शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला आले आणि त्यांच्यासोबत असलेल्या लवाजम्याने भारतात कोरोना पसरवला. मग जान्सन यांच्या बाबतीत नेमकं काय, भारत सरकार काय निर्णय घेणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही बोरीस जॉन्सन यांच्या कार्यक्रमसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

देशात 26 जानेवारी रोजी होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला भारत सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याठिकाणी धुमाकूळ घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने पुढील 15 दिवसांपर्यंत ब्रिटनमधून भारतात येणारी हवाई वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला येणा-या बोरीस यांच्याबाबतीत नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोरोनाचा ब्रिटमधील दुसरा प्रकार पहिल्यापेक्षा घातक आहे. त्यामुळे आपण आता ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली आहेत. मात्र ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले, प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील 26 जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सन प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचे, हा प्रश्नच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

दुस-या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय

राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करून सावधानता बाळगली, पण दुस-या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय आला. 2020 चे वैफल्यग्रस्त वर्ष मावळून नवा आशेचा सूर्य तेजाने तळपेल असे वाटले होते. पण राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मुंबईसारख्या शहरात नाइट लाइफ सुरू असावी अशी मागणी होती. आता रात्रीची संचारबंदी सुरू झाली. नवीन वर्षात नवा कोरोना हे चित्र निराशाजनक आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

6 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

6 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

6 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago