टॉप न्यूज

महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना जाहीर

टीम लय भारी

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्राचे पहिले सहकार महर्षी व पहिल्या विधिमंडळाचे सदस्य कै सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज जाहीर करण्यात आला(Maharshi Ganapatrao Sathe Jeevan Gaurav declared to Balasaheb Thorat).

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये सहकार महर्षी गणपतराव साठे यांचे मोठे योगदान आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा भूविकास बँकेचे मार्गदर्शक, माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संस्थापक, महाराष्ट्रातील पहिल्या जि.प. प्रशालेचे संस्थापक, आदी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजासाठी काम केले.14 जानेवारी 1946 साली जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले होते(Maharshi Ganapatrao Sathe has made a great contribution in the co-operative movement of Maharashtra).

या वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम या स्वरूपामध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच्या अमृत महोत्सवी हे वर्ष चालू आहे. त्यांच्या या कार्याची आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

यापूर्वी हा पुरस्कार पद्मभूषण माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व खासदार कल्लाप्पांना आवाडे यांना सन्मानपूर्वक सोलापूर जिल्ह्याचे त्यावेळचे पालक मंत्री मा विजयसिंह मोहिते पाटील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दिवंगत गणपतराव देशमुख, मा रामदास आठवले वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा विठ्ठल पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मा प्रकाश आवाडे, आमदार राजन पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात

बाळासाहेब थोरातांच्या दुरदृष्टीतून साकारला ई- पीक पाणी प्रकल्प, राजस्थान सरकारनेही घेतला आदर्श

Maharashtra Congress District Units Will Have Women Presidents: Nana Patole

सहकार महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार त्यांना आज जाहीर करण्यात येत आहे. मा बाळासाहेब थोरात हे 1985 पासून विधिमंडळामध्ये आमदार मंत्री म्हणून काम करत आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये त्यांचे वडील दिवंगत स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारामध्ये मोठे योगदान दिले(Balasaheb Thorat has been the MLA in the Legislative Assembly since 1985).

वडिलांचाच वारसा जपत माननीय बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे सहकारी साखर कारखाना दूध उत्पादक संघ कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध शिक्षण संस्था मजूर संस्था आदीच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळ दिले. तसेच महाराष्ट्राचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव योजना राबवल्या या सर्व बाबींचे त्यांचे योगदान लक्षात घेता. काही दिवसांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री महोदयांची वेळ घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

1 hour ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

2 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

3 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

4 hours ago