टॉप न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

टीम लय भारी

मुंबई : बेलापुर तसेच इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना योग्य तो रोजगार व योग्य ती सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारचे विकासकीय प्रयत्न सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. बेलापूर जेटी निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून सर्वप्रथम ८.५ कोटी रुपये मंजूर करून ५ जानेवारी २०२० रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. आज ह्या जेटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे(Mumbai-Belapur Water Taxi and Belapur Jetty inaugurated by CM Uddhav Thackeray).

ही जेटी उभारण्यासाठी सुमारे १५ कोटींचा खर्च झाला असून या ठिकाणी उद्यान व फूडप्लाझा तयार होणार आहे. शिवाय प्रवाशांसाठी बेलापूर जेटीचे लोकार्पण होत असल्याने २००-२५० स्थानिक प्रकल्पग्रस्तांना योग्य तो रोजगार मिळणार आहे. जेटीपर्यंत येण्या-जाण्याकरिता चार इलेक्ट्रिक बसची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे(About Rs 15 crore has been spent for the construction of Belapur Jetty).

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बेलापूर जेटीचा उल्लेख होईल, असे विकासाच्या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू आहेत. जलवाहतूक सुरू झाल्याने रस्त्यांवरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. व प्रदूषणालाही आळा बसणार आहे. असा एकमेव उद्देश यामागचा आहे. काल बुधवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर जेटीचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजप प्रभारी संजय उपाध्याय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपअभियंता प्रवीण पाटील, प्रशांत सानप उपस्थित होते(Belapur Jetty will be mentioned as a tourist destination).

हे सुद्धा वाचा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नवीन ठाणे-दिवा मार्गावर एसी गाड्यांचा करणार शुभारंभ

विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांच्या नावाने शासनाने पुरस्कार सुरू करावा ,डॉ. प्रकाश खांडगे यांची मागणी

Water taxi service from Navi Mum to city starts today

नवी मुंबई दर्शनची सुविधा मिळणार. प्रवासी जेटीमुळे नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, उरण, पनवेल अशा आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही फायदा होणार असल्याचं सांगितल जात आहे. ज्या प्रकारे पर्यटकांकरिता मुंबई दर्शन करण्यासाठी प्रवासी बस आहे, त्याच धर्तीवर नवी मुंबई दर्शन करण्यासाठीही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रवासी बस उपलब्ध करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करणार असल्‍याचे यावेळी आमदार मंदा म्‍हात्रे यांनी सांगितले.

शिवाय वॉटर टॅक्सी सुद्धा नागरिकांच्या सेवेत दाखल होत असल्याने कमी वेळात कमी पैशात सर्व सुविधा प्राप्त होणार असून स्थानिकांनाही योग्य तो रोजगार मिळेल. नवी मुंबई परिसरात नागरिकांची लक्षणीय संख्या पाहता, वॉटर टॅक्सीचा प्रवासी दर कमीत कमी असावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Team Lay Bhari

View Comments

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

35 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago