टॉप न्यूज

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेंड पसार

टीम लय भारी

नागपूर : इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) च्या ई लायब्ररीजवळ काल सायंकाळी हा थरार घडला(Nagpur: Attempt to shoot at female doctor)

एकतर्फी प्रेमातून फेसबुक फ्रेण्डने महिलेवर गोळीबाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यातून पीडिता बालंबाल बचावली.

Crime : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह; कांदिवली परिसरात खळबळ

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, तीन महिन्यांच्या बाळाचा खून

काय आहे प्रकरण?

सोमवार 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपुरातील मेडिकलच्या अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई लायब्ररीजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित इंटर्न महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून बोलत नसल्यामुळे संतप्त आरोपी विकी चकोले याने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले होते.

नेमकं काय घडलं?

आरोपी आणि पीडिता हे दोघे जण बोलत असताना अचानक कुठल्या तरी कारणावरुन त्यांच्यात खटके उडाले. त्यावरुन काही कळण्याच्या आतच आरोपीने खिशातून बंदूक काढली आणि तरुणीच्या दिशेने बंदूक ताणून धरली. त्याने बंदुकीचा ट्रिगरही दाबला होता. मात्र सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

अल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांच्या दोन पुत्रांचा गुन्ह्यांमध्ये समावेश

Jilted lover wields gun, threatens to shoot student in GMCH Nagpur

एकतर्फी प्रेमातून हत्येचा प्रयत्न?

महिलेने लगेच आरडाओरडा केला, तेव्हा जवळपास असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. संबंधित पीडित महिला नागपूरच्या मेडिकलमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

आरोपी फरार, शोध सुरु

दरम्यान, या प्रकरणी नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी विकी चकोले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं रवाना झाली आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नामुळे मेडिकल परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

5 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

5 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

7 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

10 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

10 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

13 hours ago