मनोरंजन

‘बिग बॉस विजेता शिव ठाकरे भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला

टीम लय भारी

मुंबई : ‘बिग बॉस मराठी सिझन 2’ (Bigg Boss Marathi Season 2) चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) एका भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला आहे. शिव आपल्या कुटुंबीयांसह अमरावतीवरुन प्रवास करत होता(Shiv Thackeray escapes from horrific car accident)

यावेळी वळगाव भागात त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. या अपघातात शिवसह त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले असून शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या ४६ व्या वर्षी दिला दोन जुळ्या मुलांना जन्म

मराठी साहित्य संमेलनास पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये

नेमकं काय घडलं?

अमरावतीहून अचलपूरच्या दिशेने जाणाऱ्या शिव ठाकरेच्या कारला वळगाव जवळ एका टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. या धडकेत शिवची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उलटली.

या अपघातात शिवसोबत असलेल्या त्याच्या आई आणि बहिणीलाही दुखापत झाल्याची माहिती आहे. शिवच्या कारचेही अपघातात नुकसान झाले आहे. अपघातावेळी गाडी नेमकं कोण चालवत होतं, याविषयी माहिती नाही. तसंच अपघात करणाऱ्या टेम्पो चालकावर काय कारवाई झाली, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Bigg Boss Marathi 2 Winner Shiv Thakare Met With A Car Accident, Actor Gets Stitches Near His Eyes

शिव ठाकरेला झालेल्या दुखापतीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिव आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्याचे चाहते करत आहेत.

कोण आहे शिव ठाकरे

शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी सिझन 2’चा विजेता ठरला होता. शिव मूळ विदर्भातील अमरावतीचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘बिग बॉस मराठी 2 च्या पर्वात शिव सुरुवातीपासूनच त्याच्या रांगड्या बाजामुळे चर्चेत होता. अभिनेत्री वीणा जगतापसोबत त्याची जोडी ‘बिग बॉस’च्या घरात गाजली होती.

अनेक टास्क परफॉर्म करुन त्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. अभिनेत्री नेहा शितोळेला हरवून त्याने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. सोबतच 17 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले होते. शिवने या आधी रोडीज् या हिंदी रिअॅलिटी शोमध्येही चमकदार कामगिरी केली होती.

टीम लय भारी

Recent Posts

अरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका…

32 mins ago

काँग्रेसच्या काळात आमच्याकडे खूप विकास झाला, नरेंद्र मोदींचा काळ अत्यंत वाईट

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता  होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

1 hour ago

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…

2 hours ago

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

4 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

4 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

5 hours ago