राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी 77 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. यामध्ये तरूण नेत्यांसह नव्या चेेेेहऱ्यांना मोठी संधी पक्षाने दिली आहे. कर्जत – जामखेडमधून रोहित पवार, श्रीवर्धनमधून कु. अदिती तटकरे, कोपरगावमधून आशुतोष काळे, पारनेरमधून निलेश लंके, गेवराईमधून विजयसिंह पंडीत, बीडमधून संदिप क्षीरसागर या तरूण चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली आहे. त्याचबरोबर बारामतीमधून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, तासगावमधून सुमन आर. आर. पाटील, इस्लामपुरमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, परळीतून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंब्रा – कळवा मधून जितेंद्र आव्हाड, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, अणुशक्तीनगरमधून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक या जेष्ठ नेत्यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

विद्यमान 20 आमदारांचा समावेश

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिर केलेल्या उमेदवारीच्या पहिल्या यादीत 20 आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. उल्हासनगरमधून भरत गंगोत्री या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. या शिवाय राष्ट्रवादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये पंढरपुरमधून आमदार भारत भालके, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.

महिलांनाही संधी

दरम्यान राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुष्पा ज्ञानेश्वर महाजन ( जळगाव ग्रामिण) आमदार विद्या चव्हाण (दिंडोशी)  कु. अदिती तटकरे (श्रीवर्धन), अश्विनी कदम ( पर्वती), सुमन आर. आर. पाटील ( तासगाव – कवठेमहंकाळ) या पाच महिला उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या यादीत अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप – सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

तुषार खरात

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

46 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago