28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी 77 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. यामध्ये तरूण नेत्यांसह नव्या चेेेेहऱ्यांना मोठी संधी पक्षाने दिली आहे. कर्जत – जामखेडमधून रोहित पवार, श्रीवर्धनमधून कु. अदिती तटकरे, कोपरगावमधून आशुतोष काळे, पारनेरमधून निलेश लंके, गेवराईमधून विजयसिंह पंडीत, बीडमधून संदिप क्षीरसागर या तरूण चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली आहे. त्याचबरोबर बारामतीमधून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, तासगावमधून सुमन आर. आर. पाटील, इस्लामपुरमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, परळीतून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंब्रा – कळवा मधून जितेंद्र आव्हाड, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, अणुशक्तीनगरमधून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक या जेष्ठ नेत्यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

विद्यमान 20 आमदारांचा समावेश

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिर केलेल्या उमेदवारीच्या पहिल्या यादीत 20 आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. उल्हासनगरमधून भरत गंगोत्री या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. या शिवाय राष्ट्रवादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये पंढरपुरमधून आमदार भारत भालके, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.

महिलांनाही संधी

दरम्यान राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुष्पा ज्ञानेश्वर महाजन ( जळगाव ग्रामिण) आमदार विद्या चव्हाण (दिंडोशी)  कु. अदिती तटकरे (श्रीवर्धन), अश्विनी कदम ( पर्वती), सुमन आर. आर. पाटील ( तासगाव – कवठेमहंकाळ) या पाच महिला उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या यादीत अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप – सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत तरूण, बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी