टॉप न्यूज

पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा पुन्हा भडका!

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरु असताना पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करुन सर्वसामान्यांची लूट सुरुच आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असल्या तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पंधरा दिवसांपासून वाढ होतं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली. ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर इतके झाले आहेत.

रविवारी (२१ जून) पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची, तर डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.९७ रुपये तर डिेझेलच्या दरात ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मे पासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

राजीक खान

Recent Posts

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

6 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

6 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

6 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

6 days ago

नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा दर परवडणारा नाही, त्यापेक्षा… शेतकरी काय म्हणाले?

उन्हाळ कांद्याचे ( onion) भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने 'नाफेड' व 'एनसीसीएफ'या दोन…

6 days ago

छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा: विजय वडेट्टीवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही दावे करीत असले तरी, त्यांच्यामुळेच भाजपाने विश्वासहर्ता गमावली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला…

6 days ago