टीम लय भारी
नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरु असताना पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करुन सर्वसामान्यांची लूट सुरुच आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असल्या तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पंधरा दिवसांपासून वाढ होतं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
Petrol and diesel prices at Rs 79.56/litre (increase by Rs 0.33) and Rs 78.85/litre (increase by Rs 0.58), respectively in Delhi today. pic.twitter.com/WPdIoyajhe
— ANI (@ANI) June 22, 2020
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली. ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर इतके झाले आहेत.
रविवारी (२१ जून) पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची, तर डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.९७ रुपये तर डिेझेलच्या दरात ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मे पासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.