टॉप न्यूज

SIDBI आणि Google चा करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार

टीम लय भारी

मुंबई : भारतीय लघू उद्योग विकास बँकेने (SIDBI) गुगल इंडियासोबत करार केला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSME ला सवलतीच्या व्याजदरावर एक कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र आल्या आहेत. सीडबी आणि गुगल इंडियानं सोशल इम्पॅक्ट लेंडिंग प्रोग्राम सुरू केला आहे. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं सीडबी सोबत करार केला आहे (SIDBI and Google will provide loans of Rs 25 lakh to Rs 1 crore to small businesses).

भारतीय लघू उद्योग विकास बँकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. गुगल सोबतच्या या भागीदारीमध्ये कोविड-19 महामारीमुळं निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा करार करण्यात आलाय. लघू उद्योजकांना अर्थसहाय्य म्हणून सुमारे 110 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, असं सांगण्यात आलं आहे.

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, पाहा शेवटची तारीख किती?

50 हजार ते 5 लाख, झटपट कर्ज मिळवा; पाहा काय आहे PMMY स्कीम

25 लाख ते 1 कोटींपर्यंतचं कर्ज मिळणार

या अंतर्गत 25 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचं धोरण असल्याचं सीडबीनं म्हटलं आहे. सीडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रमन म्हणाले की, “आम्ही या करारामुळे लघू उद्योग क्षेत्राला पतपुरवठा करण्याच्या प्रयत्नांना बळ देऊ शकतो. गुगल इंडिया सोबत आम्ही हे लक्ष्य निश्चितपणे साध्य करू शकू असंही, शिवसुब्रमण्यम रमन म्हणाले.

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला देणार टक्कर

SIDBI joins hands with Google to help MSMEs

भारतासारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण प्रदेशाच्या विकासाच्या गरजांची सखोल माहिती असलेल्या SIDBI सोबत हातमिळवणी करत असल्याचं गुगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले. सीडबीच्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला आनंद होत असल्याचं गुप्ता म्हणाले.

कीर्ती घाग

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago